Bicholim School News Dainik Gomantak
गोवा

Bicholim School News: डिचोली विद्यालय स्प्रे प्रकरणात मोठी कारवाई! 5 संशयित विद्यार्थी निलंबित

चौकशी पूर्ण झाल्यानंतर करणार पुढील कारवाई

Kavya Powar

Bicholim School News: डिचोलीतील शांतादुर्गा उच्‍च माध्‍यमिक विद्यालयात काल धक्कादायक प्रकार समोर आला. पेपर स्प्रेमुळे विद्यालयातील अकरावीच्या विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्या. यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली. यानंतर पालकांमधून तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.

वर्गात पेपर स्प्रेचा मारा काही विद्यार्थ्यांनीच केला असून त्यांची ओळखही पटली होती. मात्र मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे शक्य नव्हते. पण बेशुद्ध पडलेल्या विद्यार्थिनींच्या पालकांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर याबाबत आता त्या 4 संशयीत विद्यार्थ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. शिक्षण खात्याचे उपसंचालक, पोलिस अधिकारी आणि व्यवस्थापन मंडळाच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या विद्यार्थ्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मागील 2 दिवसात विद्यालयात अजून एक घटना घडली होती, त्यामधील एका संशयित विद्यार्थीनीला सुद्धा निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

आठ विद्यार्थिनींना डिस्चार्ज

विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर त्यांना म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 8 विद्यार्थिनींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 विद्यार्थिनींंवर उपचार सुरू आहेत.

Sadanand Shet Tanawade

दरम्यान, याप्रकरणी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडेंनी व्यवस्थापन मंडळाशी चर्चा केली आणि प्रकरणाचा आढावा घेतला .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सॉफ्टवेअरच सर्वेसर्वा?- संपादकीय

Goa Politics: 'मत चोरी'द्वारे जिंकण्याचा डाव, 1.27 लाख मतदार वगळले; सरदेसाईंचा भाजपवर आरोप

VIDEO: 'सुपरमॅन' मार्को जॅन्सनचा मैदानावर थरार! 6 फूट 8 इंचाच्या गोलंदाजाचा अद्भुत झेल, फलंदाजही शॉक; व्हिडिओ तूफान व्हायरल

Arpora Nightclub Fire: 'बर्च' पीडितांना भरपाई देण्यास लुथरा बंधू तयार; प्रस्‍ताव देणार, वकिलांनी दिली माहिती

Goa Shack Policy: शॅक्‍स धोरणाला एका हंगामाची मुदतवाढ, नियमभंग केल्‍यास लाखोंचा दंड; सीसीटीव्ही बंधनकारक

SCROLL FOR NEXT