Vermicompost Training Dainik Gomantak
गोवा

Vermicompost Training : बचत गटांसाठी गांडूळ खत प्रशिक्षण; डिचोली तालुक्यातील महिलांचा कार्यशाळेत सहभाग

Vermicompost Training : या कार्यक्रमास गोवा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सुरेश कुंकळीकर, उत्तर गोवा जिल्हा ग्रामीण विकास संस्थेचे व्यवस्थापक आशिष नाईक, गोवा कृषी महाविद्यालयाचे साहाय्यक प्राध्यापक डाॅ. गोविंद परब उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Vermicompost Training :

वाळपई, गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियानच्या सहकार्याने गोवा कृषी महाविद्यालय, जुने गोवे येथे सत्तरी व डिचोली तालुक्यातील महिला बचत गटांसाठी एकदिवसीय गांडूळ खत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजिला होता.

या कार्यक्रमास गोवा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सुरेश कुंकळीकर, उत्तर गोवा जिल्हा ग्रामीण विकास संस्थेचे व्यवस्थापक आशिष नाईक, गोवा कृषी महाविद्यालयाचे साहाय्यक प्राध्यापक डाॅ. गोविंद परब उपस्थित होते.

यावेळी आशिष नाईक म्हणाले, गोवा राज्य ग्रामीण विकास मिशनच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रा. सलोनी पाटील यांना गांडूळ खत तयार करण्याची क्रिया सांगितली. जिल्हा व्यवस्थापक मंदार गावस यांनी गोवा कृषी विभाग व इतर सरकारी योजनांबद्दल माहिती दिली. आभार साहाय्यक प्राध्यापक अक्षया कळगुंटकर यांनी मानले. यावेळी प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झालेल्या महिलांना प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले.

महिलांना स्वयंपूर्ण बनविणार

प्रा. डाॅ. सुरेश कुंकळीकर म्हणाले की, महिला बचत गटांनी गांडूळ खतनिर्मिती करावी, यासाठी आमचे सदैव सहकार्य लाभेल. हे खत आम्ही खरेदी करणार असून महिलांना स्वयंपूर्ण बनविण्याचा उद्देश आहे. घरच्या घरी गांडूळ खत तयार करण्याची सोपी पद्धत आहे. रासायनिक खताऐवजी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले गांडूळ खत भाजीपाल्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे त्याला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे या प्रशिक्षणाचा फायदा करून घेतला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT