Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : मुस्लिमवाडा-डिचोली येथे ‘उरूस’ उत्साहात साजरा; वाजतगाजत ‘संदल'

Bicholim News दर्ग्याकडून सुरू झालेल्या या मिरवणुकीत शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. शहरात फिरून मिरवणूक दर्ग्याजवळ येताच चादर चढविणे आदी पारंपरिक कार्यक्रम पार पाडण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, मुस्लिमवाडा-डिचोली येथील हजरत अदुलशाह बाबा रेहम्मतुल्हाह आलैय दर्ग्याचा ‘उरूस’ शुक्रवारी (१९) धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. उरूसनिमित्त मुस्लिम बांधवांतर्फे ढोल-ताशांच्या निनादात सायंकाळी शहरात वाजतगाजत भव्य ‘संदल’ (मिरवणूक) काढण्यात आली.

दर्ग्याकडून सुरू झालेल्या या मिरवणुकीत शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. शहरात फिरून मिरवणूक दर्ग्याजवळ येताच चादर चढविणे आदी पारंपरिक कार्यक्रम पार पाडण्यात आले. संदल झाल्यानंतर उरूस निमित्त नियाज (खाना) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मुस्लिम बांधवांसह अन्य धर्मीय लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकिब अली, परवीन यांचा सामना :

उरूसनिमित्त उद्या शनिवारी (ता.२०) रात्री ९ वाजता दर्ग्याजवळ कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. उत्तरप्रदेश येथील कव्वाल सकिब अली सबरी आणि निखत परवीन यांच्यात ‘कव्वाली’ची जुगलबंदी होणार आहे.

सर्वांनी उरूस आणि कव्वाली कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरम्यान, उरूसनिमित्त दर्ग्याजवळ आकर्षक सजावट करण्यात आली असून, मांडवही उभारण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT