Bicholim Traffic congestion Dainik Gomantak
गोवा

Bicholim Traffic: 'पोलिसांनी कडक कारवाई करावी!' वाहतूक कोंडी समस्येवरुन डिचोलीवासीयांची मागणी

Bicholim: डिचोलीत पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले असून, ‘ट्रॅफिक जाम’ होण्याचे प्रकार नित्याचेच बनले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Traffic Jam Issue

डिचोली: शहरात पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले असून, ‘ट्रॅफिक जाम’ होण्याचे प्रकार नित्याचेच बनले आहेत. तर दुसऱ्या बाजूने बंदी असूनही बगलमार्गावर अवजड वाहने पार्क करण्यात येत असल्याचे आढळून येत आहे.

शहरातील वाहतूक समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाई अधिक कडक करावी, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे.

डिचोली शहरातील ठराविक भागात अधूनमधून वाहतूक कोंडी होत असली, तरी विशेष करून बाजारातील रस्ता आणि सोनारपेठ-पाजवाडा रस्त्यावरील ''दीनदयाळ'' समोरील जंक्शनवर वाहतूक कोंडीचे प्रकार नित्याचेच बनले आहेत.

जंक्शनवर एक रुग्णवाहिका अडकून पडली. शहरातील कदंब बसस्थानकाकडून बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर तर वाहतूक कोंडीचे प्रकार सर्रासपणे अनुभवायला मिळतात. विशेष करून बुधवारी साप्ताहिक बाजाराच्या दिवशी तर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनते. या रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने पार्क करून ठेवण्यात येत असल्याने ही समस्या उद्भवत असते.

मध्यंतरी वाहतूक पोलिस विभागातर्फे बेशिस्त पार्किंग विरोधात दंडात्मक कारवाई हाती घेतल्यानंतर वाहतूक बेशिस्त पार्किंगचे प्रकार बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा बेशिस्त पार्किंगच्या समस्येने डोके वर काढले आहे.

बंदी क्षेत्रात पार्किंग

बसस्थानक ते शिवाजी महाराज सर्कलपर्यंतचा बगलमार्ग 'नो पार्किंग' क्षेत्र म्हणून अधिसूचित केला आहे. या बगलमार्गावर वाहने पार्किंग करण्यास बंदी आहे. तरीदेखील या बगलमार्गावर वाहने पार्क करण्याचे प्रकार चालूच आहेत. रात्रीच्यावेळी तर हमखास या बगलमार्गावर अवजड वाहने उभी ठेवलेली आढळून येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT