Crime theft Canva
गोवा

Bicholim Theft: धाडशी घरफोडीत एक कोटीचा ऐवज लंपास

Goa Crime: मुस्लिमवाडा-डिचोली येथील मोहम्मद इक्बाल मामलेकर यांच्या घरात तीन दिवसांपूर्वी ही चोरी झाली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: डिचोलीत मंदिरे फोडण्याचे प्रकार वाढले असतानाच, आता शहरातील एक घर फोडण्याची घटना घडली. या घरफोडीमुळे शहरात खळबळ माजली आहे. मुस्लिमवाडा-डिचोली येथील मोहम्मद इक्बाल मामलेकर यांच्या घरात तीन दिवसांपूर्वी ही चोरी झाली आहे.

मामलेकर यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील्स तोडून चोरट्यांनी आत शिरून घरातील रोख ९.५ लाख रुपये , २८४०० यूएस डॉलर्स तसेच विविध प्रकारचे सुवर्णलंकार लंपास केल्याची तक्रार डिचोली पोलिसांत दाखल झाली आहे.

चोरांनी लंपास केलेला ऐवज एक कोटीच्या घरात असल्याचे समजते. या चोरीप्रकरणी डिचोली पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान राज्यातील विविध भागात सातत्यानं वाढत असलेल्याच चोरीच्या प्रकरणांमुळे चोरीला आळा बसावा यासाठी शासन पातळीवर विशेष प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषकात जर्मनीचा नवा इतिहास; कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवत ब्राझीलचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

8th Pay Commission: '8 व्या वेतन आयोगा'ची लगबग: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार मोठी वाढ, काम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT