goa Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : ‘माल्या’च्या जत्रेबाबत आशा पल्लवीत

Bicholim News : मंगळवारी माले पेटण्याची शक्यता ः दोन्ही देवीच्या पेठ स्थानापन्न

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, मये येथील श्री माया केळबाई पंचायतन देवस्थानच्या प्रसिद्ध ‘माल्या’च्या जत्रेबाबत अनिश्चितता निर्माण झाली असतानाच, आता ही जत्रा साजरी होण्याचे संकेत मिळाले आहेत. जत्रेविषयी भाविकांच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत.

पूर्वापार परंपरेत खंड पडला असला, तरी मुळगावसह मयेतील श्री केळबाई देवीची पेठ मंदिरातून ‘चव्हाटा’ या पारंपरिक स्थानावर स्थानापन्न झाल्या आहेत.

एकाबाजूने यंदा माल्याची जत्रा रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला असला, तरी दुसऱ्याबाजूने ही जत्रा होणारच, असा ठाम विश्वास नाईक आणि इतर गटातील लोकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा मये गावात ‘माले’ पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मयेतील भाविकभक्तांचीही ‘माल्या’ जत्रेविषयीची उत्सुकता वाढली असून, मंगळवारी (ता.१६) परंपरेप्रमाणे ‘माल्या’ची जत्रा साजरी होणार की नाही, त्याकडे तमाम भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे.

माल्याच्या जत्रेच्या तोंडावर ही जत्रा रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. त्यामुळे आज मुळगाव आणि मयेतील मिळून दोन्ही पेठा पारंपरिक ठिकाणी स्थानापन्न होतात की नाही, त्याकडे भाविकांचे लक्ष लागून होते.

मात्र पूर्वापार चालत आलेल्या परंपरेत खंड पडूनही दोन्ही पेठा पारंपरिक चव्हाटा या ठिकाणी स्थानापन्न झाल्या आहेत. पेठ उत्सवावेळी धोंडासह भाविक आणि भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती.

गेल्यावर्षी ‘पण’ अपूर्ण

गेल्यावर्षी मंदिराला टाळे लावल्याने आणि श्री केळबाई देवीची पेठ मंदिराबाहेर काढायला मिळाली नसल्याने प्रमुख विधी अडकून पडले होते. परिणामी गेल्यावर्षी माल्याची जत्रा साजरी झालीच नाही आणि ‘माले’ ही पेटले नाहीत.

त्यामुळे डोक्यावर पेटते माले घेवून नृत्य करण्याचा देवीचा ‘पण’ही अपूर्ण राहिला होता. त्यानंतर जवळपास पंधरा दिवस श्री केळबाई देवीचे मंदिरही बंदच होते. यंदा मात्र माल्याच्या जत्रेविषयी अनिश्चितता असली, तरी दुसऱ्या बाजूने यंदा ‘माले’ पेटण्याच्या आशा वाढल्या आहेत.

पूर्वापार परंपरेत यंदा खंड

मुळगाव येथून देवीची पेठ मये येथील श्री केळबाई देवीच्या मंदिरात आल्यानंतर पारंपरिक विधी करण्यात येतात. त्यानंतर मयेतील देवीची मिळून दोन्ही पेठ चव्हाटा या स्थानी नेण्याची परंपरा आहे. आज (रविवारी) पहाटे मुळगाव येथील देवीची पेठ शेकडो भक्तांच्या साक्षीने मये येथील श्री केळबाई देवीच्या मंदिरात आली.

मात्र मुळगावची पेठ मंदिरात न जाता प्रवेशद्वारावरूनच परस्पर चव्हाटा येथे गेली. मुळगावची पेठ चव्हाटा या स्थानी गेल्यानंतर नाईक गटातील लोकांनी अवसारी मोडाकडून कौल घेऊन श्री केळबाई देवीची पेठ सजवून तासाभराने चव्हाटा येथे नेऊन स्थानापन्न केली. मुळगाव आणि मयेची पेठ चव्हाटा येथे स्थानापन्न झाल्या, तरी दोन्ही पेठा सोबतीने चव्हाटा येथे जाण्याच्या परंपरेत मात्र यंदा खंड पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT