Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोली शिमगोत्सवात आज ‘वीरभद्र’ उत्सव; सांस्कृतिक परंपरेचे जतन

Bicholim News : थयथयाट पाहण्यासाठी उसळणार गर्दी

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, आतीलपेठ - डिचोली येथील शिमगोत्सवाचे वैशिष्ट्य आणि आकर्षण असलेला ‘वीरभद्र उत्सव’ उद्या (रविवारी) साजरा होणार आहे. टाळ मृदंगाच्या ठेक्यावर आणि ‘धिन्ना था थय्या धिन्ना थय्या’च्या तालावर होणारे ‘वीरभद्र’ नृत्य’ पाहण्यासाठी यंदाही डिचोलीत गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

डिचोलीतील आतीलपेठ येथील श्री शांतादुर्गा मठ मंदिर देवस्थानच्या शिमगोत्सवातील वैशिष्ट्य आणि प्रमुख आकर्षण असलेल्या ‘वीरभद्र’ उत्सवाला सांस्कृतिक परंपरा आणि मोठा वारसा आहे. दरवर्षी धुळवडीच्या पूर्वरात्री ‘वीरभद्र’ साजरा करण्यात येतो. यंदा हा उत्सव भायलीपेठ महाजन आणि बाजारकर दहाजण मंडळातर्फे साजरा करण्यात येणार आहे.

रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ‘वीरभद्र’ साकारलेल्या व्यक्तीला विशिष्ट्य पद्धतीने सजविल्यानंतर कायरो हॉस्पिटल समोरील जंक्शनवर गाऱ्हाणे अर्थातच नमन झाल्यानंतर ‘वीरभद्र’ उत्सवाला प्रारंभ होणार आहे.

मठ मंदिरात आगमन होताना वीरभद्राची नजर देवीच्या नजरेशी एकरूप होणार नाही याची काळजी घेण्यात येते. तसेच सज्ज्याखाली येताच अवसर संचारून वीरभद्र आक्रमक होताच त्याला नियंत्रणात आणण्यात येते. वीरभद्र नृत्य झाल्यानंतर मठ मंदिरात नाट्यप्रयोग होणार आहे. सोमवारी (ता. ८) सकाळी कौलोत्सव आणि सायंकाळी धुलीवंदन होवून शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.

पखवाज आणि झांजच्या ठेक्यावर नृत्य

पखवाज आणि झांजच्या ठेक्यावर आणि ‘धिन्ना था थय्या धिन्ना थय्या’च्या तालावर हातात तलवारी घेतलेल्या वीरभद्राचा थयथयाट सुरू होणार आहे.

वाटेत गवताला लावलेली आग ओलांडून मार्गक्रमण करीत वीरभद्राचे मठ मंदिरात आगमन झाल्यानंतर देवीच्या सज्ज्याखाली येताच अवसररूपी वीरभद्राला उचलून रंगमंचावर नेण्यात येते. श्री देवी शांतादुर्गेचे तीर्थ तोंडात घातल्यानंतर वीरभद्राच्या अंगात संचारलेला अवसर निवळतो आणि मग या उत्सवाची सांगता होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT