Sarvona bison herd, Indian gaur sighting Goa, wild bison in Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bison In Bicholim: सर्वण भागात गव्यांचा धुमाकूळ, केळी, काजू कलमांची नासधूस; Watch Video

Bison In Goa: डिचोली तालुक्यातील गोकुळवाडा - सर्वण भागात सध्या गव्यांचा संचार वाढला असून रात्री तसेच दिवसा हे गवे लोकवस्तीजवळ फिरत आहेत, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: डिचोली तालुक्यातील गोकुळवाडा - सर्वण भागात सध्या गव्यांचा संचार वाढला असून रात्री तसेच दिवसा हे गवे लोकवस्तीजवळ फिरत आहेत, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. या गव्यांनी परिसरात सध्या उच्छाद मांडला असून बागायती पिकांची नासधूस सुरू केली आहे.

लोकवस्तीजवळच कळपाने गवे संचार करीत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बागायतदारही चिंतेत आहेत. गव्यांच्या दहशतीमुळे बागायतदार बागायतींत जाण्याचे धाडस करीत नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, किमान पाच ते सहा गवे कळपाने या परिसरात मुक्तपणे संचार करीत आहेत. गव्यांची दहशत वाढण्यापूर्वीच वन खात्याने या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गोकुळवाडा-सर्वण भागातील नागरिकांकडून होत आहे. गेल्या जवळपास सात-आठ दिवसांपासून लाखेरे भागात गव्यांचा संचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

केळी, काजू कलमांची नासधूस

रात्रीच्यावेळी हे गवे गोकुळवाडा भागातील बागायतींत घुसतात. गोकुळवाडा येथील बागायतदार दयानंद सावंत, गणपत सावंत आणि इतरांच्या बागायतीत हे गवे फिरल्याच्या पावलांच्या खुणाही उमटल्याचे आढळून येत आहे. गव्यांकडून त्यांच्या बागायतीतील केळी तसेच काजूची रोपे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. हे गवे आक्रमक झाले, तर माणसांवरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गव्यांची संख्या आता सर्वत्र वाढली आहे. जंगल सोडून गवे लोकवस्त्यांजवळ येण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे घाट वा डोंगराळ परिसरात त्यांना खाद्य मिळणे दुरापास्त झाले आहे. खाद्याच्या शोधार्थ गव्यांनी आपला मोर्चा लोकवस्त्यांजवळ वळवला आहे. अलीकडच्या काळात बहुतेक ग्रामीण भागात गव्यांचे अस्तित्व जाणवत आहे.

-अमृत सिंग, प्राणीमित्र

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धक्का लागताच मेट्रोत दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, केस ओढत एकमेकींना बदडले; व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले, 'रिअ‍ॅलिटी शो पेक्षाही डेंजर'

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! गोव्यात विद्यार्थ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित; बस चालकांसाठी 'पोलीस व्हेरिफिकेशन' बंधनकारक

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

SCROLL FOR NEXT