Bicholim
Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : बेरोजगारी हटवा, मगच खाणींना ‘एनओसी’; मये-वायंगिणी ग्रामसभेत स्थानिक आक्रमक

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, मये-वायंगिणी पंचायतीच्या ग्रामसभेत पुन्हा एकदा खाणींचा मुद्दा उपस्थित झाला. जोपर्यंत बेरोजगारी आदी गावचे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत खाण व्यवसायाला पंचायतीने ''ना हरकत दाखला'' (एनओसी) देऊ नये, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. तसा ठरावही घेण्यात आला आहे.

नीलेश कारबोटकर, नागेश नाईक आणि इतरांनी खाणींचा हा मुद्दा ग्रामसभेत उपस्थित केला. वेगवेगळ्या प्रश्नांवरून मायनिंगचा मुद्दा ग्रामसभेत तापला. ही ग्रामसभा आज नवनिर्वाचित सरपंच सीमा आरोंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पंचायत इमारतीतील सभागृहात पार पडली. सरपंच आरोंदेकर यांनी स्वागत केल्यानंतर पंचायत सचिव महादेव नाईक यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले.

नूतन पंचायत इमारत प्रकल्पाचे काम पूर्ण न होताच त्याचे लोकार्पण केले, असा मुद्दाही स्थानिकांनी उपस्थित केला. ग्रामसभेविषयी गावात जनजागृती करा, अशी सूचनाही ग्रामस्थांनी केली. या ग्रामसभेत कचरा आणि इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.

तीन पंचसदस्य अनुपस्थित

या ग्रामसभेस सरपंच सीमा आरोंदेकर यांच्यासह कनिवी कवठणकर, वासुदेव गावकर, विशांत पेडणेकर, दिलीप शेट, सुवर्णा चोडणकर, वर्षा गडेकर, विनिता पोळे हे आठ पंचसदस्य उपस्थित होते, तर उपसरपंच सुफला चोपडेकर यांच्यासह मावळते सरपंच विद्यानंद कारबोटकर आणि कृष्णा चोडणकर हे तीन पंचसदस्य अनुपस्थित होते.

गोशाळेचा विषय ऐरणीवर

सिकेरी येथील गोशाळेमुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो, असा मुद्दा नितीन गोवेकर आणि इतरांनी उपस्थित केला. गोशाळेसाठी बेकायदा विस्तारीत काम केले असून याची संबंधित यंत्रणेकडे तक्रार करा, अशी सूचना पंचायतीला केली. गोशाळेचे सर्वेसर्वा कमलाकांत तारी यांनी गोशाळा स्थापन करण्यामागील हेतू सांगितला. स्थानकांची तक्रार असल्यास त्यावर तोडगा काढू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंचायत करणार पाहणी :

वेदांता (सेसा) कंपनीकडून बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन सुरू असल्याचा आरोपही ग्रामसभेत करण्यात आला. मात्र, या आरोपाबाबत पंचायतीने कानावर हात ठेवताना खाण व्यवसाय सुरू करण्यास पंचायतीने ''एनओसी'' दिलेली नाही. खनिज उत्खनन होत असल्यास त्याची पाहणी करण्यात येईल, असे स्पष्टीकरण सरपंच सीमा आरोंदेकर यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: पाऊस ओसरला, पण धोका कायम! हवामान खात्याकडून 'ऑरेंज अलर्ट'; धारगळीत महामार्गावर दरड कोसळली

Goa Todays Live Update: राज्यात पावसाचा हाहाकार; धारगळ येथे पुन्हा दरड कोसळली

Navelim News: वैयक्तिक कारणावरून नावेली ग्रामसभेत राडा; खुर्च्या फेकण्याचा प्रकार

Wall Collapses At Kundaim: पावसाचा रौद्रावतार! कुंडईमध्‍ये भिंत कोसळून ३ ठार

Goa Pali Waterfall: धबधब्यावर अडकले तब्बल १७० जण आणि त्यानंतर....

SCROLL FOR NEXT