Bicholim Rain Dainik Gomantak
गोवा

Bicholim Rain : डिचोलीत वळीवाचा तडाखा; वीज खंडित

Bicholim Rain : सर्वण येथे आयोजित व्हॉलीबॉल लीग स्पर्धेअंतर्गत शनिवारी रात्री सामने खेळविण्यात येत होते. मात्र मध्यरात्री अचानक पावसाळी वातावरण तयार होताच सामने स्थगित करण्याची पाळी आयोजकांवर आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Rain :

डिचोली, गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून, शनिवारी मध्यरात्रीनंतर आज (रविवारी) सायंकाळी पुन्हा एकदा डिचोलीत जोरदार पावसाने तडाखा दिला.

काल मध्यरात्री आणि आज सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. काही काळ वीज पुरवठा खंडित झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या लोकांची गैरसोय झाली.

विजेचा लखलखाट अन् ढगांच्या गडगडाटासह डिचोलीतील बहुतेक सर्व भागात शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी सायंकाळी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मात्र या पावसामुळे झाडांची पडझड वा अन्य कोणतीही आपत्ती ओढवली नाही. काल मध्यरात्रीपासून आज सायंकाळपर्यंत पावसावेळी झाडांची पडझड झाल्याच्या एकाही कॉलची नोंद झाली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.

शनिवारी मध्यरात्री डिचोलीत अवकाळी पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला. पाऊस मध्यरात्रीच्या सुमारास पडल्याने जनजीवनावर मोठासा परिणाम झाला नाही. मात्र वीज प्रवाह बंद झाल्याने भागात काळोखाचे साम्राज्य पसरले होते. रविवारी सकाळपर्यंत वीज गुल झाली होती.

मैदान झाकून ठेवण्याची पाळी

सर्वण येथे आयोजित व्हॉलीबॉल लीग स्पर्धेअंतर्गत शनिवारी रात्री सामने खेळविण्यात येत होते. मात्र मध्यरात्री अचानक पावसाळी वातावरण तयार होताच सामने स्थगित करण्याची पाळी आयोजकांवर आली.

स्पर्धेसाठी खास तयार करण्यात आलेले मैदानही ताडपत्री घालून झाकून ठेवावे लागले. आज सकाळी आयोजकांनी उर्वरीत सामने खेळविण्यासाठी मैदान व्यवस्थितपणे तयार केले, असतानाच सायंकाळी पुन्हा पावसाने तडाखा दिल्याने मैदानाची वाताहात झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar Yojana: अमित शहा उघडणार 'माझे घर'चे द्वार, 50 टक्‍के गोमंतकीयांना मिळणार लाभ - मुख्‍यमंत्री

Mopa Airport: मोपा विमानतळाबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्याला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या VIDEO

Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाचं ऐतिहासिक 'शतक'! सलग दोन वर्षांत अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू VIDEO

तोंडावर गोळी घातली नंतर वाहनाखाली चिरडले; गुरांच्या तस्करीला विरोध करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

SBI Bank Robbery: कर्नाटकातील एसबीआय बँकेवर मोठा दरोडा! तीन दरोडेखोरांनी लुटले 21 कोटींचे दागिने आणि रोकड, आरोपी पंढरपूरच्या दिशेने पसार

SCROLL FOR NEXT