Bicholim Rain
Bicholim Rain  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Rain : अवकाळी पावसामुळे बळीराजा बनला चिंताग्रस्त; घास हिरावला जाण्‍याची भीती

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Rain :

डिचोली तालुक्यातील सुर्ल भागात वायंगण भातशेती कापणीच्या कामाला हात घातला असतानाच, अवकाळी पाऊस पडल्याने बळीराजा काहीसा चिंताग्रस्त बनला आहे.

आज (शनिवारी) पडलेल्या अवकाळी पावसामुळे वायंगण भातपिकाची मोठीशी नासाडी झाली नसली, तरी अवकाळी पावसाचा तडाखा चालूच राहिल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्‍याची भीती आहे.

आज पडलेल्या अवकाळी पावसाचा वायंगण भातशेती आणि अन्य कृषी पिकावर विशेष परिणाम झालेला नाही. अशी माहिती कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. तब्बल अठरा वर्षांच्या खंडानंतर डिचोली तालुक्यातील सुर्ल गावातील शेतकरी गेल्या वर्षांपासून शेतीत उतरले आहेत.

गेल्यावर्षी समाधानकारक पिक मिळाल्यानंतर यंदाही सुर्लमधील शेतकऱ्यांनी जोशीभाट येथील ९.२ हेक्टर वायंगण शेती लागवडीखाली आणली आहे. यंदाही शेती समाधानकारक बहरली असून, पिकून तयार झाली आहे.

काही शेतकऱ्यांनी भात कापणीच्या कामाला हात घातला असतानाच, आज सकाळी अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी चिंतेत अडकले आहेत.

भातपीक अजून तरी सुरक्षित

यंदा वायंगण शेती समाधानकारक बहरली आहे. भातपिकाची कापणी सुरु केली असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने चिंता वाढली आहे. अजून भातपिक सुरक्षित आहे. मात्र अवकाळी पावसाने सलग तडाखा दिल्यास हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होण्याची भीती आहे.

-विष्णू नाटेकर, शेतकरी (सुर्ल)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Bloomberg Billionaires Index: एलन मस्क यांनी पुन्हा दाखवला जलवा, संपत्तीत मोठी वाढ; अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट

Goa Film City: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

SCROLL FOR NEXT