Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : खाण ब्लॉकसाठी उद्या जनसुनावणी; ‘ईआयए’चा मुद्दा तापेल

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, अडवलपाल-थिवी खाण ब्लॉकसाठी शुक्रवारी (ता.१५) जनसुनावणी होणार असून त्याकडे अडवलपालवासीयांसह पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

पर्यावरण आघात मूल्यांकन (ईआयए) अहवाल आणि खाणव्याप्त अडवलपालवासीयांची भूमिका यावरच जनसुनावणीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. मात्र, मागील दोन ग्रामसभेत तापलेला खाण विषय ही पार्श्वभूमी पाहता, शुक्रवारची जनसुनावणी तापण्याची शक्यता आहे.

अडवलपाल-थिवी खाण ब्लॉक फोमेन्तो रिसोर्सीस कंपनीच्या ताब्यात असून, या खाण ब्लॉकअंतर्गत डिचोली तालुक्यातील अडवलपाल आणि बार्देश तालुक्यातील थिवीतील भाग मिळून ३६.२२०२ हेक्टर क्षेत्रफळ येत आहे. प्रतिवर्ष ०.३ मिलियन टन खनिज उत्खनन करण्यासाठी या खाणीला पर्यावरणीय दाखला आवश्यक आहे.

अडवलपाल-थिवी खाण ब्लॉकअंतर्गत फोमेन्तो रिसोर्सीस कंपनीला खाणीसाठी पर्यावरण दाखला (ईसी) मिळवण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारी ही जनसुनावणी निश्चित केली आहे. डिचोलीतील वाठादेव येथील झांट्ये महाविद्यालयाच्या जिमखाना सभागृहात सकाळी १०.३० वाजल्यापासून ही जनसुनावणी होणार आहे. तत्पूर्वी ९ वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

‘ईआयए’अहवाल अमान्य

गेल्या १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या अडवलपाल पंचायतीच्या ग्रामसभेत खाणीचा विषय तापला होता. गाव उद्धवस्त होत असेल, तर गावात खाण व्यवसाय नकोच, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. खाणींमुळे गावातील लोकांना अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. कंपनीने तयार केलेला पर्यावरण आघात मूल्यांकन (ईआयए) अहवालही दिशाभूल करणारा आणि खोटा असल्याचा दावा ग्रामस्थांनी करून, जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली होती.

नैसर्गिक जलस्रोत नामशेष

गेल्यावर्षी २९ ऑक्टोबर रोजीच्या ग्रामसभेतही खाणीचा विषय तापला होता. खाण व्यवसायामुळे आधीच गावातील नैसर्गिक जलस्रोत नामशेष झाले आहेत.

जे जलस्रोत शिल्लक राहिले आहेत त्यावरही खाण व्यवसायाचा परिणाम होत आहे. शेती-बागायती पीकही धोक्यात आले आहे. गावात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे, असा दावा ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थ आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्यास जनसुनावणी तापण्याची शक्यता अधिक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT