Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Goa Crime News: चिंतेची बाब तीन खून प्रकरणांत परप्रांतीयांचा संबंध जोडलेला आहे. डिचोली पोलिसांनी शीघ्रगतीने तपास करताना या पाचही खून प्रकरणांतील मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे.

Sameer Panditrao

डिचोली: अंगावर शहारे आणणाऱ्या रोलिंगमिल-न्यूवाडा येथील महिलेच्या हत्या प्रकरणामुळे डिचोलीसह सर्वत्र खळबळ माजली आहे.

या खून प्रकरणानंतर आता यापूर्वी गेल्या काही वर्षांत डिचोलीत घडलेल्या खून प्रकरणांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. डिचोली पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गेल्या सव्वाचार वर्षांत दोन महिलांचा मिळून खुनाच्या पाच घटना घडल्या आहेत.

चिंतेची बाब म्हणजे तीन खून प्रकरणांत परप्रांतीयांचा संबंध जोडलेला आहे. डिचोली पोलिसांनी शीघ्रगतीने तपास करताना या पाचही खून प्रकरणांतील मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे.

शुक्रवारी (ता.२५) रोलिंगमिल-न्यूवाडा (वाठादेव) येथे भर दिवसा आणि रस्त्यावर रबिया हवांगी या २५ वर्षीय विवाहित महिलेचा निर्दयीपणे खून करण्याची घटना घडली. पती मैनुद्दीन याने तलवारीचे सपासप वार करून रबिया हिचा खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतर शरण आलेल्या मैनुद्दीन याला पोलिसांनी अटक केली आहे.

पत्नीने काढला पतीचा काटा

२९ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री डिचोलीतील ‘सेतू संगम’ येथे मूळ हुक्केरी-बेळगाव येथील रमेश पोशालप्पा सिद्धागोळी (३९) या युवकाचा निर्दयीपणे खून करण्यात आला होता. भावोजीच्या मदतीने पत्नीनेच पती रमेश याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्दयीपणे हत्या केली होती. या खूनप्रकरणी मूळ महाराष्ट्रातील संगीता रमेश सिद्धागोळी (२९) या महिलेसह कैलासनगर-अस्नोडा येथे राहणारा रामू शंकर गवळी (५०) या दोघाही संशयित आरोपींना पोलिसांनी आठ तासांच्या आत अटक केले होते.

वाठादेव परिसरात पतीकडून पत्नीचा खून

२०२२ साली मे महिन्यात रोलिंगमिल-वाठादेव परिसरात मूळ बिहारमधील बलराम यादव या कामगाराने आपल्या पत्नीला ठार केले होते. पत्नीला ठार केल्यानंतर संशयित बलराम यादव हा आपल्या तीन वर्षीय बालिकेला घेऊन पसार झाला होता. मात्र, मिळालेल्या धाग्यादोऱ्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित मारेकरी बलराम यादव याला अटक करण्यात यश मिळवले होते. तत्पूर्वी मार्च २०२१ मध्ये ऐन शिमगोत्सव काळात बंदरवाडा-डिचोली येथे एका स्थानिक युवकाचा खून करण्यात आला होता. मद्याच्या नशेत खुनाचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी स्थानिक युवकाला खुनाच्या आरोपाखाली अटक केली होती.

बालकाची निर्दयीपणे हत्या

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विठ्ठलापूर-कारापूर येथे अकरा वर्षीय बालकाचा निर्दयीपणे खून करण्याची घटना घडली होती. उत्तर प्रदेशमधील समीर अली या बालकाचा खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाला योग्य दिशा देताना खून करून पसार झालेल्या चंदू पाटील या संशयित आरोपीच्या सहा तासांच्या आत मुसक्या आवळून त्याला अटक केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT