Bicholim police Seized Without Number Plate Bike Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: डिचोलीत एकाच दुचाकीच्या चार नंबरप्लेट, अनेक दुचाकी नंबरप्लेटशिवाय

महाविद्यालयाबाहेरील प्रकार; प्राचार्यांच्या तक्रारीनंतर डिचोली पोलिसांची कारवाई

तुकाराम सावंत

Bicholim Police Seized Without Number Plate Bike: पेपर स्प्रे प्रकरणानंतर आता डिचोली तालुक्यातील एका महाविद्यालयाजवळ नंबरप्लेट नसलेल्या दुचाकी आढळून आल्या. चार संशयास्पद दुचाकींमधील दोन दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. तर अन्य दुचाकीना 'लॉक' लावली आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकीची झडती घेतली असता डिकीत वेगवेगळ्या बनावट नंबरप्लेट आढळून आल्या. याबाबत डिचोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, "महाविद्यालयाच्या कंपाउंडाबाहेर पार्क केलेल्या दुचाकीमध्ये नंबरप्लेट नसलेल्या दुचाकी असल्याचे आढळून येते. दुचाकीबद्दल संशय आल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये यासाठी पोलिसांना कळविण्यात आले अशी माहिती संबंधीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली.

पोलिसांनी महाविद्यालयाच्या परिसरात दाखल होत पाहणी केली असता, चार दुचाकींना नंबरप्लेटी नसल्याचे आढळून आले. यातील दोन दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत तर अन्य दुचाकींना 'लॉक' लावली.

दुचाकींची झडती घेतली यावेळी एका दुचाकीच्या डिकीमध्ये वेगवेगळ्या बनावट नंबरप्लेट आढळून आल्या. ती दुचाकी पोलिस स्थानकात नेण्यात आली. डिचोली पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT