Police Action Against Labor in Bicholim Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत बसस्थानकाजवळ मजुरांची पोलिसांकडून धरपकड

मजुरांचा अडथळा दूर होईपर्यंत ही मोहीम सुरुच राहणार; पोलिसांची भूमिका

दैनिक गोमन्तक

डिचोली : शहरातील पर्यायी बसथांब्यावरील संभाव्य धोका टाळण्यासाठी बसस्थानकाबाहेर रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मजुरांविरोधात पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. आज शुक्रवारी पोलिसांनी बसस्थानकाजवळ गर्दी करुन थांबलेल्या मजुरांना हुसकावून लावत मजुरांची धरपकडही केली. मजुरांचा अडथळा दूर होईपर्यंत ही मोहीम सुरुच राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

डिचोली शहरातील बसस्थानकाबाहेर रोज सकाळी मजुरांची गर्दी असते. मजुरीच्या प्रतीक्षेत रोज शेकडो मजूर भर रस्त्यावरच गर्दीने उभे असतात. आधीच या मजुरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. त्यातच सध्याचा पर्यायी बसथांबा भर रस्त्याला टेकून करण्यात आला आहे. मजुरांच्या गर्दीमुळे प्रवासी बसगाड्या आतबाहेर घेताना एखादेवेळी मोठा अनर्थ घडण्याची भीती आहे. त्यामुळे या मजुरांना तेथून हुसकावून लावावे, अशी मागणी फारुख आगा यांच्यासह प्रवासी आणि अन्य नागरिकांनी केली आहे.

दरम्यान काल गुरुवारी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी बसस्थानकाला भेट दिली असता, तेथील दुकानदार तसेच प्रवाशांनी मजुरांचा उपद्रव त्यांच्यासमोर मांडला होता. त्यावेळी आमदारांनी पोलिसांशी संपर्क साधून मजुरांचा बंदोबस्त करण्याची सूचना केली होती.

रोजच्याप्रमाणे आजही शुक्रवारी सकाळी मजुरांनी बसस्थानक परिसरात गर्दी केली होती. त्या ठिकाणी पोलिस आले आणि त्यांनी मजुरांना हुसकावून लावताना काही मजुरांना ताब्यात घेतले. पोलिस येताच मजुरांची धावपळ सुरू झाली. मजुरांनी नंतर गावकर वाड्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आपला मोर्चा वळवला. साधारण अर्धा तास हे नाटक सुरू होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मजुरांना नंतर कडक समज देऊन सोडून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT