डिचोली: डिचोली पालिकेच्या रिक्त नगराध्यक्षपदासाठी येत्या बुधवारी (ता. २२) निवडणूक होणार असून, नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते. त्याकडे डिचोलीवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. पुंडलिक (कुंदन) फळारी यांनी ७ रोजी दिलेला नगराध्यक्षपदाचा राजीनामा पालिका प्रशासन खात्याने मंजूर करून, नवा नगराध्यक्ष निवडण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वा. पालिका मंडळाची विशेष बैठक बोलावली आहे.
डिचोलीचे (Bicholim) उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांची निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, नगराध्यक्ष पदाखातीर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येत्या मंगळवारी (ता. २१) दुपारपर्यंत मुदत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महिन्यापूर्वी डिचोली पालिकेत नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींनी उचल खाल्ली होती.चौदापैकी ९नगरसेवकांनी ९ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष फळारी यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांसह भाजप (BJP) नेत्यांनी शिष्टाई केल्यामुळे फळारी यांच्यावरील अविश्वास ठरावाचे संकट टळून त्यांची खुर्ची शाबूत राहिली होती. मात्र, एका नाट्यमय घडामोडीत आठ दिवसांपूर्वी फळारी यांनी अचानक राजीनामा देऊन सर्वांना धक्का दिला. भाजप नेत्यांच्या आदेशानुसार राजीनामा दिल्याचे फळारी यांनी स्पष्ट करून राजीनामा नाट्यावर पडदा टाकला होता.
डिचोली पालिकेचा नवीन नगराध्यक्ष कोण? कोणाच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडते, त्याकडे डिचोलीवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. उत्सुकताही ताणली आहे. प्राप्त माहितीनुसार, नगराध्यक्ष पदासाठी सध्यातरी दोन नावे चर्चेत असल्याचे कळते. दुसऱ्याबाजूने मावळते नगराध्यक्ष फळारी यांच्यासाठी काही नगरसेवकांचा हट्ट आहे, भाजपचे काही नेते त्यांच्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे फळारी यांची पुन्हा नगराध्यक्षपदी निवड झाली, तर त्यात नवल नाही. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.