Dr. Chandrakant Shetty Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : आमठाणे धरणाच्या सौंदर्यीकरणाला गती द्या - डॉ. चंद्रकांत शेट्ये

आमदार चंद्रकांत शेट्ये : अधिकाऱ्यांनी घेतला कामाचा आढावा

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : आमठाणे धरणाच्या सौंदर्यीकरण कामाला गती द्या, असे निर्देश आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. आमदार डॉ. शेट्ये यांनी सोमवारी (ता.३) आमठाणे धरणावरील कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. सध्याच्या कामाबाबत आमदार डॉ. शेट्ये यांनी समाधानही व्यक्त केले. जलस्रोत खात्यातर्फे आमठाणे धरण परिसरात विकसीत काम हाती घेण्यात आले आहे.

मोपा येथील मनोहर विमानतळाला जोडणाऱ्या धरण परिसरातील रस्त्याच्या कामाचीही आमदार डॉ. शेट्ये यांनी पाहणी केली. यावेळी आमदारांसमवेत आयडीसीच्या अधिकारी साधना बांदेकर, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहायक अभियंत्ता रश्मी मयेकर,

जलस्रोत खात्याचे अभियंते नरेश पोकळे, भंडारी यांच्यासह जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, लाटंबार्सेचे सरपंच पद्माकर मळीक, पंच कृष्णा आरोलकर, रामा गावकर, जमीनदार बबनराव राणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT