Bicholim Market | Ganeshotsav 2024 Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi: आगमनाची तयारी सुरू! डिचोली बाजारात भक्तगणांची लगबग

Ganesh Chaturthi 2024: सध्या पडत असलेल्या पावसामुळे व्यापारीवर्गासह गणेशभक्तही काहीसे चिंतेत असल्याचे दिसून येत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: चतुर्थीनिमित्त बाजारपेठा सजू लागल्या असून, सर्वत्र उत्साह संचारला आहे. सजावटीच्या साहित्यासह चतुर्थीसाठी लागणाऱ्या वस्तू डिचोलीच्या बाजारात दाखल झाल्या असून, बाजार हळूहळू फुलू लागला आहे.

बाजार संकुल परिसरात खास स्टॉलही थाटण्यात आले आहेत. या स्टॉलमधून विविध साहित्य विक्रीस उपलब्ध झाले आहे. सजावटीच्या साहित्याची खरेदीही सध्या सुरू झाली असली, तरी अद्याप जोर आलेला नाही. पुढील दोन दिवसांनंतर खरेदीला जोर येण्याची आशा विक्रेत्यांना आहे. दुसऱ्या बाजूने सध्या पडत असलेल्या पावसामुळे व्यापारीवर्गासह गणेशभक्तही काहीसे चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.

चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सध्या डिचोलीचा बाजार सजावटीच्या वेगवेगळ्या आणि आकर्षक साहित्याने सजला आहे. कागदी पताकांसह रेडिमेड पुष्पहार आदी वेगवेगळ्या डिझाईनचे साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. हे साहित्य गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. आकर्षक मखरेही बाजारात आली आहेत.

आकर्षक सजावट साहित्य

गणेशभक्तांचा कल लक्षात घेऊन सजावट साहित्य उपलब्ध करण्यात येते. यंदा वेगवेगळ्या डिझाईनचे सजावट साहित्य उपलब्ध आहे. सजावटीच्या साहित्यासह मोत्यांचे अलंकार, मुकुट हे साहित्य गणेशभक्तांसाठी आकर्षण ठरत आहे, असे विक्रेत्यांच्या म्हणणे आहे. चतुर्थी बाजारावेळी पावसाने कृपादृष्टी ठेवली, तर खरेदीला जोर येणार, असा आशावाद विक्रेत्यांना आहे.

चित्रशाळांमध्ये लगबग सुरू!

गणेशचतुर्थीला आता अवघे दिवस राहिले असून गणपतीच्या चित्रशाळांमध्ये गणपतींच्या मूर्ती रंगवण्याचे काम वेगाने सुरू असून रात्री जागू लागल्या आहेत. तसेच प्रत्येकजण आपले घर आणि घराचा परिसर स्वच्‍छ करताना दिसत असून घरांची रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. गणपती उत्सवासाठी लागणारे साहित्य बाजारात उपलब्ध असून खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे. पताका, विद्युत साहित्य, मखर, माटोळीचे साहित्य, चौरंग, पाट आदी खरेदीकडे वाढता ओढा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT