Fish Market Gomantak Digital Team
गोवा

Fish Price Hike in Bicholim : दिवस सुक्या मासळीचे, डिचोलीत वाढतेय आवक; पुरूमेंताची तयारी

पावसाळा जवळ आल्याने ‘खाऱ्यां’च्या खरेदीला वाढता जोर

गोमन्तक डिजिटल टीम

पावसाळा जवळ आल्याने सध्या डिचोलीत प्रत्येकजण पुरूमेंताच्या वस्तू खरेदी करण्यात व्यग्र असून, सुक्या मासळीच्या खरेदीलाही जोर आल्याचे दिसून येत आहे. समुद्रातील ताज्या मासळीची निर्माण होणारी अनुपलब्धता त्यातच या मासळीचे दरही आवाक्याबाहेर गेल्याने सध्या सुक्या मासळीला चांगले दिवस आले आहेत.

डिचोलीतही सध्या सुक्या मासळीला तेजी आली आहे. स्थानिक मासळीसह राज्याबाहेरूनही सुकी मासळी विक्रीस उपलब्ध होत असली, तरी स्थानिक सुक्या मासळीला खवय्यांची अधिक पसंती असल्याचे दिसून येते. पावसाळ्यात आवश्यक तेवढी सुक्या मासळीची बेगमी करण्यात बाजारात आज खवय्ये मग्न असल्याचे दिसून येत होते.

मागणी असली, तरी त्यामानाने सुक्या मासळीचे दर अजून तरी परवडण्यासारखे आहेत. सुके बांगडे आकाराप्रमाणे100 रुपयांना 8 ते 10 नग, सुकी सुंगटे 100 ते 200 रु. पड, गालमा 50 ते 100 रुपये पड, खारी 100 ते 200 रुपये वाटा असे सुक्या मासळीचे दर आहेत. पावसाळा जवळ आल्याने सध्या सुक्या मासळीला मागणी आहे. असे या विक्रेत्यांचे म्हणणे आहे.पावसाळा सुरू होईपर्यंत बाजारात सुक्या मासळीला मागणी असणार आहे, असे काही विक्रेत्यांनी सांगितले.

सुक्या मासळीचा खास बाजार

क्वचित अपवाद सोडल्यास डिचोली बाजारात नियमित सुकी मासळी उपलब्ध होत नाही. डिचोलीत बुधवारी तर साखळीत सोमवारी आठवडी बाजाराच्या दिवशी खास सुक्या मासळीचा बाजार भरत असतो. तर आज (सोमवारी) दोन्ही शहरातील आठवडी बाजाराच्या दिवशी सध्या मोठ्या प्रमाणात सुकी मासळी विक्रीस उपलब्ध होत आहे. पावसाळा जवळ आल्याने खरेदीही जोरात सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT