Honey Dainik Gomnatak
गोवा

Bicholim News : मधपेट्यांचे रहस्य उलगडून दाखवण्यासाठी; विद्यार्थांना धडे

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोलीतील साळ पुनर्वसन येथील उपक्रमशील असलेली सरकारी प्राथमिक विद्यालयाने इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास विषयातील ‘अनिता आणि मधमाशी’ या पाठांवर आधारीत मधमाशी आणि मध निर्मितीची प्रक्रिया दाखवणारा विशेष उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना मधपेट्यांचे रहस्य उलगडून सांगितले.

दोडामार्ग येथील मध निर्माण करणारे आणि मधपेट्यांचे संकलन करणारे संजय सावंत यांनी या उपक्रमावेळी विद्यार्थ्यांना मध निर्माण होण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. दोडामार्ग येथे एका परसबागेत हा कार्यक्रम झाला.

सावंत म्हणाले, मधमाशी ही समूहात राहणारा एक किटक आहे. राणीमाशी ही त्यांची प्रमुख असते. त्याचबरोबर कामगार, मध गोळा कामगार, सैनिक अशा प्रकारात मधमाश्या असतात. राणीमाशी ही पेटीत राहून अंडी घालते.

मधमाश्या बाहेर जाऊन फुलातून मध गोळा करतात. कामगार माश्‍या मधाचे पोळे बनवत असतात तर सैनिक माश्या पोळ्यांचे संरक्षण करण्याचे काम करीत असतात. पोळ्यात थोड्याशा नर माश्‍या देखील असतात, अशी माहिती संजय सावंत यांनी दिली.

तसेच त्यांनी मधाची पेटी बनवणे, मध काढताना घालण्यात येणारा विशिष्ट सूट, चाळीदार टोपी याची प्रात्यक्षिके दाखवून मुलांना माहिती दिली.

फळ झाडे किंवा विविध पिकांना चांगले पीक यायचे असल्यास त्यांच्या फुलांचे परागीकरण होणे गरजेचे आहे. मधमाश्या असे परागीकरण करतात.

त्यामुळे शेती- बागायती- फळ झाडांची पिके वाढवण्यासाठी मधमाश्या पेट्यांचे पालन केले जाते. आम्ही आमच्या बागायतीत अशा पेट्यांचे संकलन केल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभारी मुख्याध्यापक धाकटू पाटील म्हणाले, मुलांना निसर्गातील कृमी - कीटकांची आवड निर्माण व्हावी, मधगोळा करण्याची प्रक्रिया समजावी, म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला.

प्रत्यक्ष ज्ञानप्राप्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात चांगली भर पडली. यावेळी शिक्षक संकेत नाईक व इयत्ता चौथीचे विद्यार्थी उपस्थित होते.

फुलांचे परागीकरण

मधमाशी ही मध गोळा करण्याचे काम करत असताना फुलांचे परागीकरण करण्याचे महत्त्वाचे काम करीत असते. फुलांपासून फळे यायची असल्यास फुलांवर मधमाशी बसल्यावर फुलांचे नत्र संपूर्ण पसरते आणि त्याचे परागीकरण होते.

जेव्हा हे परागीकरण यशस्वी झाले, तर फुलांवरून फळे होणार आणि ही फळे नंतर बिया देतात आणि बियांपासून झाडे तयार होतात. त्यामुळे झाडांच्या उत्पत्तीस मधमाश्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT