Priya Yadav  Dainik Gomantak
गोवा

Cash For Job प्रकरणी एक ‘सोनार’ अडचणीत? सोन्याची बिस्कीटे ठेवली गहाण; पोलिसांनी घेतली जबानी

Priya Yadav Case: डिचोलीतील सोनाराकडे प्रिया यादव हिने सोन्याचा एक किंमती दागिना गहाण ठेवून त्याच्याकडून ४ लाख रुपये घेतले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Priya Yadavs Cash For Job Scam Widens: Goldsmith Implicated in 4 Lakh Rupee Transaction

डिचोली: प्रिया यादव हिने डिचोलीतील चार बहिणींची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील एक ‘सोनार’ अडचणीत येण्याची शक्यता आहे. संबंधित सोनाराकडे प्रिया यादव हिने सोन्याचा एक किंमती दागिना गहाण ठेवून त्याच्याकडून ४ लाख रुपये घेतले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चौकशीचे काम सुरू केले आहे. फसवणूक झालेल्या चारही बहिणींसह संबंधित सोनाराला स्थानकात पोलिसांनी बोलावून त्यांची जबानी घेतली आहे, अशी माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार प्रिया यादवने भगिनींपैकी एकीकडून घेतलेली ११६ ग्रॅम सोन्याची बिस्कीटे सोनाराकडे गहाण ठेवली,अशी माहिती मिळाली.

सुमारे कोटीची फसवणूक

प्रिया यादव हिने बोर्डे-डिचोली येथील जयंती, ललिता, मिलन आणि पूर्णा वायंगणकर या चार बहिणींना रोख ७९.३३ लाख आणि सुवर्णालंकार मिळून एक कोटीच्या आसपास गंडा घातला आहे. २०१७ ते २०२४ या सात वर्षांच्या कालावधीत वेगवेगळी आमिषे दाखवून प्रिया हिने या बहिणींची फसवणूक केल्याचे समजते. याप्रकरणी जयंती वायंगणकर हिने डिचोली पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रिया विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT