Bicholim Garbage Problem Gomantak Digital Team
गोवा

Bicholim Garbage Problem : कारापूर-सर्वणमध्ये रस्त्यालगत 'कचरा' टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

ओंगळवाणे दृश्‍य : असह्य दुर्गंधी; दंडात्मक कारवाईची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Garbage Problem : कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात पुन्हा कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला उकिरड्याचे स्वरूप आले आहे.

विशेष म्हणजे, पंचायतीतर्फे घरोघरी कचऱ्याची उचल होत असूनही उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर पंचायतीने दंडात्मक कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे.

कारापूर-तिस्क, कुळण, गोकुळवाडा, न्यू वाडा, सर्वण आदी भागांत कचऱ्याची समस्या आहे. तेवढ्यापुरती साफसफाई केली, की काही दिवस हा परिसर स्वच्छ दिसून येतो.

नंतर पुन्हा कचऱ्याची समस्या डोके वर काढते. हा कचरा कोठून येतोय आणि कोण टाकतो, त्याबद्दल गूढ निर्माण झाले आहे.

सर्वण रस्त्यावरील उतरणीलगत गेल्या काही वर्षांपासून कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. या रस्त्यावरून ये-जा करणारे सर्रास याठिकाणी कचरा टाकतात. तीन वर्षांपूर्वी पंचायतीने कारवाई करण्याचा इशारा देताच या प्रकारावर नियंत्रण आले होते.

एक वर्षापूर्वी येथील झाडेझुडपे छाटली होती. मात्र, पुन्हा सर्वण येथील त्या जागेला उकिरड्याचे स्वरूप आले आहे.

सूचना फलक गायब

डिचोली-साखळी या मुख्य रस्त्याला जोडून सर्वण गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या बाजूला कचरा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे असह्य दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना त्रास होत आहे.

सर्वण रस्त्याच्या उतरणीवर तर सध्या प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, याठिकाणी पंचायतीने लावलेला सूचना फलकही गायब झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Naru Disease: गोवेकरांनो सावधान! फोंड्यात आढळला धोकादायक ‘नारू’? 25 वर्षांपूर्वी झाला होता देशातून नष्‍ट

Poingunin: काँग्रेसच्‍या काळात फक्त विकासकामांचे दगड! पंचायतमंत्री गुदिन्हो यांचा टोला; पैंगीणमध्ये सभागृहाचे उद्‌घाटन

Goa Live News: एअर इंडियाच्या गोंधळानंतर काँग्रेस नेते आणि खासदार वेणुगोपाल यांनी चेन्नई विमानतळावरचा अनुभव केला शेअर

Goa Marathi Film Festival: जारण, कुर्ला टू वेंगुर्ला, जित्राब! मराठी चित्रपटांना रसिकांची मोठी गर्दी

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार! वेधशाळेने दिला इशारा; 14 तारखेपासून यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT