Ganeshotsav 2025 Dainik Gomantak
गोवा

Ganesh Festival: बाप्पाच्या आगमनाची तयारी, गणेशमूर्ती घडविण्याची लगबग सुरू; मूर्तिकारांना चिंता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची

Ganeshotsav 2025: तमाम गणेशभक्तांना आता गणेशचतुर्थीचे वेध लागले असून सध्या डिचोलीतील विविध भागांतील चित्रशाळांमधून गणपतीच्या मूर्ती घडविण्याची लगबग सुरू झाली आहे.

Sameer Amunekar

डिचोली: तमाम गणेशभक्तांना आता गणेशचतुर्थीचे वेध लागले असून सध्या डिचोलीतील विविध भागांतील चित्रशाळांमधून गणपतीच्या मूर्ती घडविण्याची लगबग सुरू झाली आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर मूर्तिकारांनी वेगवेगळ्या भागातून चिकणमाती उपलब्ध केली असून मूर्तिकारांचे हात कामाला लागले आहेत. विविध चित्रशाळांमधून गणपतीच्या मूर्ती आकार घेऊ लागल्या आहेत.

चिकणमाती चित्रशाळेत आणीपर्यंत आलेला खर्च आणि वाढत्या महागाईमुळे यंदा गणपतीच्या मूर्तींचे दर किंचित वाढण्याची शक्यता आहे. तसे संकेतही काही मूर्तिकारांनी दिले आहेत. तरीदेखील राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे आक्रमण ही स्थानिक पारंपरिक मूर्तिकारांसाठी चिंतेची बाब बनली आहे. बालगोपाळांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या आणि हिंदूंचा मोठा धार्मिक सण असलेली गणेशचतुर्थी यंदा ऑगस्ट महिन्याच्या २७ तारखेला साजरी होणार आहे.

डिचोलीत शंभरहून अधिक चित्रशाळा असून मये गावात सर्वाधिक चित्रशाळा आहेत. मयेतील कुंभारवाडा तर चित्रशाळांसाठी प्रसिद्ध आहे. चतुर्थीला साधारण पावणेदोन महिने राहिल्याने डिचोलीत विविध भागातील मूर्तिकारांनी चिकणमाती उपलब्ध केली आहे.

बंदी असतानाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती

बंदी असताना आणि स्थानिक मूर्तिकारांचा विरोध असूनही गेल्या काही वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींनी राज्यात आक्रमण केले आहे. शाडू मातीच्या मूर्ती असल्याचे सांगून पीओपी मूर्तींची विक्री होत असते.

या मूर्ती दिसायला सुबक व वजनाने हलक्या असल्याने काही भक्त या मूर्तींना पसंती देतात. पीओपी मूर्तीमुळे पारंपरिक मूर्तिकारांच्या व्यवसाय व कलेला फटका बसत आहे, अशी रुपेश शेट (मये), सज्जन गावकर (कारापूर) आदी बहुतेक मूर्तिकारांची कैफियत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT