Bicholim Fish Market Gomantak Digital Team
गोवा

Bicholim Fish Market: परप्रांतीय सुकी मासळीविक्रेत्‍यांची संख्‍या वाढली

डिचोलीत अतिक्रमण : स्थानिक विक्रेत्यांचा व्यवसाय आलाय अडचणीत; कारवाईची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Fish Market: पावसाळा जवळ आल्याने सध्या सुक्या मासळीला मागणी असली तरी परप्रांतीय विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे डिचोलीतील स्थानिक पारंपरिक विक्रेत्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. परप्रांतीयांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक विक्रेते पुरते अडचणीत आले आहेत.

परप्रांतीय मासळी विक्रेत्‍यांच्‍या वाढत्या अतिक्रमणामुळे आमच्या व्यवसायावर गदा आली असल्‍याची व्यथा डिचोली बाजारातील स्थानिक पारंपरिक विक्रेते मांडत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून डिचोली बाजारात परप्रांतीय विक्रेत्यांचा आकडा वाढला असून, हे विक्रेते मिळेल त्याठिकाणी जागा अडवून व्यवसाय करतात.

त्यामुळे आम्हाला व्यवसायाला फटका बसत आहे, असे स्थानिक विक्रेत्यांचे म्हणणे आहे.डिचोली बाजारात नियमित सुकी मासळी उपलब्ध होत नसली तरी बुधवारी साप्ताहिक बाजाराच्या दिवशी खास सुक्या मासळीचा बाजार भरत असतो.

जुन्या बाजारातून नवीन बाजार संकुलाजवळून जाणाऱ्या रस्त्यावर सुक्या मासळीचा बाजार भरत असतो. मात्र या बाजारात आता सुकी मासळी खरेदीसाठी पूर्वीसारखी गर्दी दिसून येत नाही. साप्ताहिक बाजाराच्या दिवशी अन्यत्र सुकी मासळी मिळत असल्याने ग्राहक मुद्दामहून ''खाऱ्यां''च्या बाजारात येण्याचे कष्ट घेत नाहीत.

काही वर्षांपूर्वी पावसाळा जवळ आला की सुक्या मासळीच्या पुरुमेंतासाठी बाजारात गर्दी होत असे. मात्र आता ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे, असे पारंपरिक विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

भाजी मार्केटच्‍या ठिकाणीही मासेविक्री

साप्ताहिक बाजाराच्या दिवशी परप्रांतीय विक्रेत्यांपैकी बहुतेक जण सुक्या मासळीच्या बाजारात बसण्याचे टाळून भाजी मार्केट आदी मोक्याच्या ठिकाणी बसतात. त्यामुळे बऱ्याच ग्राहकांनी सुक्या मासळीच्या बाजाराकडे पाठ फिरविली आहे. बाजारात विविध ठिकाणी बसणाऱ्या विक्रेत्यांना पालिकेने रोखून सुक्या मासळीच्या बाजारात बसण्याची ताकीद द्यावी, अशी मागणी पारंपरिक विक्रेत्या महिलांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT