Pilgao, Bicholim Farmer Protest Dainik Gomantak
गोवा

Goa Mining Issue: खनिज वाहतुकीचा मुद्दा तापला, पिळगावातील शेतकरी बायका मुलांसह रस्त्यावर; सरकारला सज्जड इशारा

Bicholim Mining Transport Issue: खनिज वाहतुकीच्या मार्गात केवळ पाच घरे येत असल्याचा अहवालातील उल्लेख पूर्ण चुकीचा, शेतकऱ्यांची टीका.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: शेतकऱ्यांच्या मागण्या दुर्लक्षित करून खनिज वाहतूक सुरू केली तर संभाव्य गंभीर परिणामांना तोंड देण्याची तयारी ठेवावी, असे आव्हान पिळगावमधील शेतकऱ्यांनी 'वेदांता'सह सरकारला दिले आहे. शेतकऱ्यांनी गुरुवारी (१२ डिसेंबर) बायका मुलांसह माठवाडा-सारमानस जंक्शनजवळ एकत्र येत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

'वेदांता'ने सरकारला विकत घेतले आहे, त्यामुळेच सरकार कंपनीसमोर नमते घेऊन कंपनीची पाठराखण करीत आहे, असा आरोप अनिल सालेलकर आणि अन्य शेतकऱ्यांनी आज (गुरुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. खनिज वाहतुकीच्या मार्गात केवळ पाच घरे येत असल्याचा अहवालातील उल्लेख पूर्ण चुकीचा आहे, असेही या शेतकऱ्यांनी स्पष्ट करताना सरकारवर कडाडून टीका केली.

सारमानस जंक्शनजवळ शक्तीप्रदर्शन

पिळगाव जंक्शन ते सारमानस जेटीपर्यंत खनिज वाहतूक करण्यास सरकारने मान्यता दिल्याच्या वृत्तामुळे पिळगावमधील शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी बायका मुलांसह शेतकऱ्यांनी माठवाडा-सारमानस जंक्शनजवळ संघटित होत शक्तीप्रदर्शन केले.

शेतकऱ्यांचे आंदोलन हाणून पाडू, या ट्रकमालक संघटनेच्या वक्तव्याचाही शेतकऱ्यांनी समाचार घेतला. ट्रकमालकांनी केवळ स्वतःच्याच नव्हे, तर आम्हालाही पोट आहे त्याची जाण ठेवावी, असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

क्रिकेट विश्वावर शोककळा! रणजी क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू, बॅटिंगनंतर छातीत दुखू लागले अन्...

Kushavati District: ‘कुशावती’बाबत नवीन अपडेट! भाडेकरू, हॉटेल कामगारांच्या पडताळणीचे आदेश; ओळखपत्राची सक्ती

SCROLL FOR NEXT