Dr. Chandrakant Shetye Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election : डिचोली मतदारसंघात आमदार शेट्येंचा वरचष्‍मा

30 पैकी 21 उमेदवारांनी मिळविला विजय

दैनिक गोमन्तक

डिचोली : डिचोली विधानसभा मतदारसंघातील पाचपैकी चार ग्रामपंचायतींत आपल्या गटाने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. 30 पैकी 21 उमेदवार निवडून आलेले आहेत. समर्थक पंचसदस्यांना विश्वासात घेऊन या पंचायतींमध्‍ये सत्ता स्थापन करण्यात येईल, असे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले. निवडून आलेल्या नवनिर्वाचित पंचसदस्यांच्या उपस्थितीत येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडून आलेल्या पंचसदस्यांचे अभिनंदन करतानाच त्‍यांनी मतदारांनाही धन्यवाद दिले.

यावेळी लाटंबार्सेचे जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, माजी उपसरपंच बबनराव राणे, डॉ. दिनेश आमोणकर, अडवलपालचे माजी सरपंच मनोज साळगावकर आदी उपस्थित होते.

आपल्या गटातील नवनिर्वाचित पंचसदस्यांना अनुभवी तज्‍ज्ञांकडून प्रशिक्षण देण्याचा आपला मनोदय आहे. पंचायतींचा कारभार स्थिर ठेवतानाच, नियोजनबद्ध विकास करण्यावर भर देण्यात येईल. असे डॉ. शेट्ये यांनी सांगितले.

डिचोली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले ध्‍येय आहे. आणि आता पंचायत निवडणुकीतील विजयामुळे ते आणखी सोपे बनले आहे, असे डॉ. शेट्ये म्‍हणाले.

बबनराव राणे आणि प्रदीप रेवोडकर यांनी नवनिर्वाचित पंचसदस्यांनी संघटित राहून पंचायतींना स्थिरता द्यावी असे आवाहन केले. गुरूदास परब, पद्माकर मळीक, मनस्वी कवठणकर, विनेश्री गावकर या नवनिर्वाचित पंचांनीही मनोगत व्यक्त करताना आमदार शेट्ये यांच्‍या सहकार्यामुळेच विजय सोपा झाल्याचे सांगितले.

डॉ. शेट्ये म्‍हणाले...

  • डिचोली मतदारसंघातील विविध पंचायतींवर मिळून आपण 30 उमेदवार पुरस्कृत केले होते. पैकी 21 उमेदवार निवडून आले आहेत.

  • मेणकुरे-धुमासे पंचायतीत आपले सर्व पाचही तर मुळगाव पंचायतीत सातपैकी पाच उमेदवार निवडून आले आहेत.

  • लाटंबार्से आणि साळ पंचायतीत बहुमत मिळवण्यात यश मिळविले आहे.

  • अडवलपाल पंचायतीत आपल्या गटाचा एक पंच बिनविरोध निवडून आला असून, तेथेही सत्तास्थापनेची संधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT