Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim: चित्रविचित्र मुखवटे, पिचकाऱ्या अन्‌ रंगांची आरास; शिमग्याच्या साहित्याने डिचोली बाजार फुलला, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

Bicholim Market: रंगांची उधळण आणि पारंपरिक ‘सवंग्यां’ची सजावट यासाठी ओळखला जाणारा शिमगा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: रंगांची उधळण आणि पारंपरिक ‘सवंग्यां’ची सजावट यासाठी ओळखला जाणारा शिमगा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, डिचोलीत सर्वत्र सणाचे वातावरण फुलू लागले आहे. शिमग्यानिमित्त बाजारपेठेत गुलाल, पिचकाऱ्या, मुखवटे आणि अन्य सजावटीच्या साहित्याची रेलचेल दिसून येत आहे. खरेदीला सुरवात झाली असून, पुढील दोन दिवसांत ती अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यंदा बाजारात विविध आकार, रंग आणि आकर्षक डिझाइनच्या पिचकाऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. १०० रुपयांपासून १,००० रुपयांपर्यंत किंमत असलेल्या या पिचकाऱ्यांकडे लहान मुलांचा विशेष ओढा दिसून येतो. तसेच प्राण्यांच्या चेहऱ्यांशी साधर्म्य असलेले आणि अक्राळविक्राळ स्वरूपाचे मुखवटेही विक्रीस ठेवण्यात आले असून, त्यांची किंमत सुमारे ८०० रुपयांपर्यंत आहे.

‘काळानुरूप सण साजरा करण्याच्या पद्धतीत बदल होत असला, तरी ग्रामीण भागात मुखवटे आणि गुलाल यांना अजूनही मोठी मागणी आहे,’ असे शहरातील घाऊक विक्रेते शिरोडकर यांनी नमूद केले.

नैसर्गिक रंग बाजारात दाखल!

शिमगा म्हणजे रंगांची उधळण करण्याचा उत्सव. त्यामुळे बाजारात विविध प्रकारचे रंग (गुलाल) विक्रीस उपलब्ध झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक रंगांना मागणी असल्याने यंदाही विक्रेत्यांनी नैसर्गिक रंग उपलब्ध केले आहेत. डिचोलीतील बहुतेक सर्व भागात रंगपंचमी किंवा धुळवड साजरी करण्यात येत असल्याने रंगांना मागणी असते. त्यामुळे बाजारात लाल, पिवळा, निळा आदी विविध प्रकारचे रंग आले आहेत. सोमवारी (ता.२) रात्री गावोगावी होळी पेटल्यानंतर सर्वत्र शिमग्याचा माहोल तयार होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT