Bad Roads In Goa Dainik Gomantak
गोवा

Bicholim: दगड घालून खड्डे बुजवले, पावसाने होत्याचे न्हवते केले; डिचोलीतील अंतर्गत रस्त्यांची लागली ‘वाट’

Bicholim Road: डिचोली शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होऊन वाट लागली असून, रस्त्यांवरील खड्डे रुंदावत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

Sameer Panditrao

डिचोली: डिचोली शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होऊन वाट लागली असून, रस्त्यांवरील खड्डे रुंदावत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. भर पावसात या रस्त्यांवरून वाट काढताना वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पावसाच्या कहरामुळे तर भर चतुर्थीत वाहनचालकांना वाहने हाकताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. कदंब बसस्थानकाकडून बाजारात जाणाऱ्या रस्त्यासह बोर्डे येथे मुख्य रस्ता, भायलीपेठ सोनारपेठ आदी शहरातील काही अंतर्गत रस्त्यांची वाताहात झाली आहे. या रस्त्यांवर लहान खड्डे पडले असून, पावसामुळे हे रस्ते रुंदावत आहेत.

पावसावेळी हे खड्डे पाण्याने भरत असून, त्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. बऱ्याचदा या खड्डयांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो. खड्डयांमुळे गचके बसून वाहनांचे सुटे भाग मोडत असून, दुचाकी घसरून लहानसहान अपघातही होत आहेत.

अशी माहिती उपलब्ध झाली आहे. पावसावेळी खड्डे पाण्याने भरले की, वाहने जाताना खड्डयांतील पाणी रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांवर उसळण्याचे प्रकार वाढले. दरम्यान, दगड घालून रस्त्यांवरील खड्डे बुजवले होते. मात्र जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा खड्डे निर्माण झाले आहे. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी शहरातील बहूतेक रस्ते फोडले होते.

जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर फोडलेले रस्ते जाग्यावर घालण्याचे काम सुरु करतानाच अवकाळी पावसाचा धुमाकूळ आणि नंतर मोसमी पावसाला सुरवात झाली यामुळे चर बुजवून रस्ते पूर्ववत करण्याचे कामात अडथळा येऊन हे गडबडीत करावे लागले. त्यामुळेच रस्त्यांची काहीशी वाईट स्थिती झाली आहे, असे बांधकाम खात्यातील एका अधिकाऱ्याने मान्य करून, शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT