Amthane Dam  Dainik Gomantak
गोवा

Amthane Dam: ‘आमठाणे’ची दुरुस्ती पुन्हा लांबणीवर! काम अंतिम टप्प्यात; धरणात नियंत्रित जलसाठा

Amthane Dam Gates: दुरुस्तीसाठी दोन महिन्यांपूर्वी या धरणातील जलसाठा कमी करण्यात आला होता. जुलै महिन्यात पातळी जेमतेम पाच मीटर इतकी राहिली होती आणि पात्र कोरडे पडले होते.

Sameer Panditrao

डिचोली: डिचोलीतील आमठाणे धरणाचे दुरुस्ती काम पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. दुरुस्तीकाम पूर्ण कधी होणार, याची प्रतीक्षा सुरू आहे. दुसरीकडे समाधानाची बाब म्हणजे धरणात आता जलसाठा होऊ लागला आहे.

दुरुस्तीसाठी दोन महिन्यांपूर्वी या धरणातील जलसाठा कमी करण्यात आला होता. जुलै महिन्यात पातळी जेमतेम पाच मीटर इतकी राहिली होती आणि पात्र कोरडे पडले होते. गेल्या आठ-दहा दिवसांच्या पावसामुळे पाण्याची पातळी मंगळवारी (ता. २) जवळपास ४५ मीटरवर पोहोचली आहे.

पाणीबाणी टाळण्यासाठी स्वयंचलीत गेट

जानेवारीत तिळारी कालव्याला भगदाड पडून ‘पाणीबाणी’ निर्माण झाली होती. ती स्थिती टाळण्यासाठी धरणावर दुरुस्ती करून स्वयंचलीत गेट बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र सध्याच्या गतीनुसार हे काम पूर्ण होण्यासाठी अजून किमान आठ ते दहा दिवस लागतील.

निश्चित वेळ टळली, तरीही...

गेल्या जुलै अखेरपर्यंत दुरुस्तीकाम पूर्ण करण्याचे जलसंपदा खात्याचे नियोजन होते. १४ जुलैला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी धरणाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला होता व ते वेळेत पूर्ण होईल असा विश्‍‍वास व्यक्त केला होता.

जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनीही तसेच सांगितले होते. मात्र जुलै अखेर उलटून गेला. त्यानंतर ‘चार-पाच दिवसांत काम पूर्ण होईल’ असे आश्वासन दिले गेले. तरीही धरणावरील दुरुस्तीकाम अद्याप सुरूच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT