Amthane Dam Water Level  Dainik Gomantak
गोवा

Amthane Dam: ‘आमठाणे’वरील गेट दुरुस्त होण्याची प्रतीक्षा! दुरुस्तीकाम लांबणीवर पडल्याने गोंधळ; धरणात पाणीसाठा कमीच

Amthane Dam Gates: डिचोलीतील आमठाणे धरणावरील ‘गेट’ आदी दुरुस्तीचे काम पुन्हा लांबणीवर पडले असून, हे जलाशय आता नेमके कधी भरणार, त्याची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

Sameer Panditrao

डिचोली: डिचोलीतील आमठाणे धरणावरील ‘गेट’ आदी दुरुस्तीचे काम पुन्हा लांबणीवर पडले असून, हे जलाशय आता नेमके कधी भरणार, त्याची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. आतापर्यंतचे काम पाहता ते पूर्ण होण्यास आणखी किमान आठवडाभर तरी लागेल असे वाटते. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनीही तसे संकेत दिले आहेत.

गेल्या जानेवारी महिन्यात ‘पाणीबाणी’च्यावेळी उद्भवलेली समस्या पुन्हा निर्माण होऊ नयेत. त्यासाठी धरणावर दुरुस्ती करून स्वयंचलित गेट बसविण्यात येत आहे. या कामासाठी धरणातील जलसाठा खाली करण्यात आला आहे.

आमठाणे धरणावरील दुरुस्ती काम गेल्या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करून धरणात पुन्हा जलसाठा करण्याचे जलसंपदा खात्याने नियोजन केले होते. मात्र, जुलै महिन्यात दुरुस्तीकाम पूर्ण करण्यात संबंधित खात्याला यश आले नाही. त्यामुळे धरणात जलसाठा करण्याचे कामही लांबणीवर पडले आहे.

दरवर्षी साधारण जुलै महिन्यात ‘फुल्ल’ होणारे आमठाणे धरण यंदा मात्र भर पावसात अजूनही कोरडे पडल्याचे दिसून येत आहे. धरण कोरडे असले, तरी त्यामुळे पाणीपुरवठ्यावर कोणताही होणार नाही. आवश्यकतेवेळी साळ बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून विश्वास, तरीही..!

गेल्या महिन्यात म्हणजेच १४ जुलै रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत एका कार्यक्रमानिमित्त मेणकुरे येथे आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमठाणे धरणाला धावती भेट देऊन संबंधित कंत्राटदारांकडून कामाचा आढावा घेतला होता. हे काम जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता.

त्याच्यापूर्वी जलसंपदा खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनीही तसा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण करणे शक्य झाले नाही. त्यानंतर हे काम पूर्ण करण्यास आणखी चार-पाच दिवस लागणार, असे शिरोडकर यांनी स्पष्ट केले होते. तरीही काम लांबणीवर पडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तान पुन्हा हादरला! बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 9 पाकिस्तानी सैनिक ठार

Mungul Firing Case: मुंगुल गोळीबार प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई, 7 अटकेत, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

Shubman Gill: गिलने रचला इतिहास! सलग चौथ्यांदा जिंकला ICC 'प्लेअर ऑफ द मंथ' अवॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Cricket News: क्रिडाविश्वात खळबळ, 34 वर्षीय स्टार खेळाडूनं सोडला देश, आता या' देशाकडून खेळणार क्रिकेट

Goa Crime: डॉक्टर निघाला ठग! 1.41 लाखांचे दागिने लंपास; 9 गुन्हे दाखल झालेला ऑर्थोपेडिक सर्जन अडकला

SCROLL FOR NEXT