Goa Soil for Parliament House Sandip Desai
गोवा

पूजन गोव्याच्या मातीचे! संसद भवनासाठी पाठवल्या जाणाऱ्या गोव्याच्या मातीचे भूमिपूजन

नवी दिल्ली येथील नवीन संसद भवनासाठी गोव्यातील माती पाठवणार असून यासाठी विविध भागातून गोळा केलेल्या मातीचा भूमिपूजन सोहळा आज 29 जुलै रोजी सायंकाळी 4.00 वाजता इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

दैनिक गोमन्तक

गोवा : नवी दिल्ली येथील नवीन संसद भवनासाठी गोव्यातील माती पाठवणार असून यासाठी विविध भागातून गोळा केलेल्या मातीचा भूमिपूजन सोहळा आज 29 जुलै रोजी सायंकाळी 4.00 वाजता इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, निळकंठ हळर्णकर, आमदार जेनिफर मोन्सेरात, जीत आरोलकर, संचालक सगुण वेळीप व मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, यासाठी नागरिकांनी आपल्या गावातील महत्वाच्या ठिकाणाची माती घेऊन मोठ्या संख्येने या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. कारण जमवलेली माती देशातील कारभार ज्या इमारतीतून चालवला जाणार आहे.

त्या संसद भवनासाठी ही माती जमा केली जाणार आहे. या मातीचे पूजन होईल, त्यानंतर ती नवीन संसद भवनासाठी नवी दिल्लीला पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती वेळीप यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT