Bhoma Highway Dainik Gomantak
गोवा

Bhoma Bypass: गाव विभागून चौपदरी रस्ता नको! ग्रामसभेत भोमवासीय आक्रमक; बगलमार्गाला प्राधान्‍य देण्‍याची मागणी

Bhoma 4 Lane Road: सरकार गावातून चौपदरी रस्ता करण्याबाबत आग्रही असून त्याचा आम्‍ही निषेध करतो असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले.

Sameer Panditrao

Bhoma Road WIdening Villagers Oppose

फोंडा: भोम-अडकोण पंचायतीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत बगलमार्गाचा पुनरुच्चार करताना गाव विभागून आम्हाला चौपदरी मार्ग नकोच, असा पवित्रा पुन्‍हा एकदा ग्रामस्थांनी घेतला. या ग्रामसभेत प्रामुख्याने बगलमार्गावर भर देताना इतर काही विषयांवर चर्चा झाली.

सरपंच दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला इतर पंचसदस्य उपस्थित होते. पंचायत सचिवांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केल्यानंतर भोम चौपदरी रस्त्यासह इतर विषय चर्चेला आले.

गावाचे विभाजन करून आम्हाला चौपदरी रस्ता नकोच. आम्ही यापूर्वीच गावाबाहेरून बगलमार्गावर भर दिला आहे. मात्र सरकार गावातून चौपदरी रस्ता करण्याबाबत आग्रही असून त्याचा आम्‍ही निषेध करतो असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले.

दरम्‍यान, बाणस्तारी मार्केटचा प्रश्‍‍न सुटत नसल्याने लोकांनी दुकानांसाठी भरलेले पैसे परत करण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयात २७ रोजी सुनावणी असून त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे पंचायतीने सांगितले.

मंत्री गोविंद गावडेंनी घेतलेली बैठक बेकायदा

चौपदरी रस्त्याबाबत स्थानिक आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांनी म्हार्दोळ येथे घेतलेली बैठक बेकायदेशीर आहे. भोममधील रस्त्यासंबंधी भोमवासीयांशी अगोदर बोला, असे ग्रामस्थांतर्फे संजय नाईक यांनी सांगितले. पंचायतीने या विषयावर सरकारी यंत्रणेशी पत्रव्यवहार करताना ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

कुंडई औद्योगिक वसाहतीत बेकायदा भूखंड

कुंडई औद्योगिक वसाहतीत काही आस्थापनांकडून जमीन समप्रमाणात आणून प्लॉट केले जात असल्याचा विषय ग्रामसभेत चर्चेला आला. अशा प्रकारामुळे नैसर्गिक नाल्यांवर परिणाम होत असून पावसाळयात पूर येण्याची भीती व्‍यक्त करण्‍यात आली. त्यावर सरपंच नाईक यांनी संयुक्त पाहणी करणार असल्‍याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "POGO विधेयक एक दिवस विधानसभेत मंजूर होईल" मनोज

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT