bhom land conversion protest goa Dainik Gomantak
गोवा

"हे नक्की काय चाललंय?", भोममधील बागायती जमिनीच्या रुपांतरणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; सरपंचांना निवेदन देत आंदोलनाचा दिला इशारा!

bhom land conversion protest goa: भोम येथील जमीन रुपांतरणाचा विषय ऐरणीवर आला असून कलम ‘३९ अ’ खाली कोणत्याही स्थितीत येथील बागायती जमीन रुपांतरास स्थानिकांचा तीव्र विरोध असेल असे जाहीर करून स्थानिकांनी भोम पंचायतीच्या सरपंचांना निवेदन सादर केले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: भोम येथील जमीन रुपांतरणाचा विषय ऐरणीवर आला असून कलम ‘३९ अ’ खाली कोणत्याही स्थितीत येथील बागायती जमीन रुपांतरास स्थानिकांचा तीव्र विरोध असेल असे जाहीर करून स्थानिकांनी भोम पंचायतीच्या सरपंचांना निवेदन सादर केले. यावेळी संजय नाईक तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील जमीन ‘३९ अ’ खाली रुपांतरणास आली असल्याने भोमवासीयांनी आश्‍चर्य व्यक्त केले असून हे काय चालले आहे, असा सवाल स्थानिकांनी केला आहे.

भोम येथील चौपदरी रस्त्याचा प्रश्‍न आधीच तापला आहे. त्यात भोमच्या जमिनींच्या कलम ‘३९ अ’ खाली भू रुपांतरणाचा प्रयत्न होत आहे. आता सरकारचे प्रशासन आपल्याला पाहिजे ते करीत असल्याने भोमवासीयांनी संताप व्यक्त केले आहे. येथील बेकायदा कृत्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आंदोलनाचीही (Protest) तयारी ‘आमी भोमकार’ या स्थानिकांच्या संघटनेने ठेवली असून तसा इशाराही दिला आहे.

भोम येथे ३६ प्लॉट तयार करण्यात आले आहेत, त्यांना वाट नाही, रस्ता नाही. मात्र, हे प्लॉट कसे तयार झाले, असा सवालही ग्रामस्थांनी केला आहे.

भोम पंचायत स्थानिकांसमवेत!

भोम अडकोण पंचायतीला स्थानिकांनी निवेदन दिले असून ३९ अ कलमाला पंचायतीने ठाम विरोध करावा, असे आवाहन केले आहे. यापूर्वी भोम पंचायतीच्या ग्रामसभेत या कलमाला विरोध करण्यात आला आहेच, तरीही सरकारी प्रशासन या कलमाचा आग्रह का करीत आहे, असा सवाल स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, भोम पंचायत ही ग्रामस्थांसोबत असून ग्रामस्थांना जे नको आहे आणि कायद्यात जे बसत नाही, त्याला पंचायतीचा ठाम विरोध असेल, असे सरपंच अब्दुल खान यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi River Water Pollution Report: कॅसिनो आणि सागरी नौकांच्या परिसरातील मांडवी नदीचे पाणी किती सुरक्षित? प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दुसरा अंतरिम अहवाल सादर!

CK Nayudu Trophy: आर्यन नार्वेकर, दिशांक मिस्कीन अन् जीवनकुमारची दमदार फलंदाजी, बिहारविरुद्ध गोव्याची द्विशतकी मजल

WPL Auction 2026: गोव्याच्या पूर्वजा वेर्लेकरची डब्ल्यूपीएल लिलावात धडक; महिला प्रीमियर लीगच्या लिलाव यादीत मिळवले स्थान!

Guru Ketu Yuti: नोकरी आणि व्यवसायात घवघवीत यश मिळवण्याची सुवर्णसंधी, सिंह राशीतील गुरु-केतु युती ठरणार फायदेशीर; आयुष्यात घेऊन येणार सुख, समृद्धी

Ranji Trophy: उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात गोव्याची पिछाडी; पण फिरकीपटूंच्या जोरदार माऱ्यामुळे सामना अजूनही रंगतीत!

SCROLL FOR NEXT