Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : शांतादुर्गा बाल भजनी मंडळासह ६ पथके राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र

Shantadurga Bal Bhajani Mandal : केंद्रनिहाय निकाल जाहीर ः पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती स्पर्धा

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, कला अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती विभागीय बाल कलाकार भजन स्पर्धेचा तीन केंद्रावरील निकाल जाहीर करण्यात आला.

असून त्यात अनुकमे - श्री शांतादुर्गा बाल भजनी मंडळ, बांदोडा-फोंडा, बाल भवन केंद्र, मडगांव, दाडेश्वर कला केंद्र, नादोडा - बार्देश, श्री शांतादुर्गा जांभळेश्वर सांस्कृतिक संस्था, कळंगुट-बार्देश, सरकारी माध्यमिक विद्यालय, आमोणा - डिचोली व स्वर साधना सांस्कृतिक कला संस्था, माडेल, चोडण तिसवाडी ही सहा पथके राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहेत.

या केंद्रांचा सविस्तर निकाल पुढे देण्यात आला आहे. केंद्र.

राजीव गांधी कला मंदिर, फोंडा येथे १८ जुलै रोजी स्पर्धा घेतलेल्या पहिल्या केंद्रावरील स्पर्धेत अनुक्रमे ः श्री शांतादुर्गा बाल भजनी मंडळ, बांदोडा, बाल भवन केंद्र, मडगाव व सर्वोदय एज्युकेशनल सोसायटिज हायस्कूल, कुडचडे यांना प्राप्त झाले. उत्तेजनार्थ ः सिध्देश्वर नवदुर्गा, बाल कलाकार भजनी मंडळ, सुर्ला-डिचोली, श्री सातेरी प्रासादिक संगीत संस्था, बेतोडा-फोंडा व श्री महालक्ष्मी बाल भजनी मंडळ, तिवरे.

वैयक्तिक पारितोषिक

उत्कृष्ट गायन (पहिला अभंग) भक्ती नाईक (श्री शांतादुर्गा बा.भ. मंडळ, बांदोडा), (दुसरा अभंग) श्रेया संदीप गवस ( सर्वोदय एज्युकेशनल सोसायटिज हायस्कूल, कुडचडे) यांना देण्यात आले. स्वामिनी शिरोडकर (बाल भवन केंद्र, मडगाव) यांना उत्कृष्ट गवळण/भारुड गायनासाठी बक्षीस देण्यात आले. रामा नाईक, गजानन नार्वेकर व श्याम सूर्या नाईक यांनी परीक्षण केले.

केंद्र. क्र. २

श्री शांतादुर्गा संस्थान मंडप, कळंगुट येथे १९ जुलै रोजी घेतलेल्या दुसऱ्या केंद्रावर अनुक्रमे ः दाडेश्वर कला केंद्र, नादोडा बार्देश, श्री शांतादुर्गा जांभळेश्वर सांस्कृतिक संस्था, कळंगुट-बार्देश व श्री सातेरी बाल भजनी मंडळ, मयडे-बार्देश यांना पारितोषिक प्राप्त झाले. उत्तेजनार्थ ः श्री राम सेवा संघ बाल भजनी मंडळ, मयडे - बार्देश, स्वर साधना सांस्कृतिक बाल भजनी मंडळ, मांद्रे व बाल भवन केंद्र, कारापूर.

वैयक्तिक उत्कृष्ट गायन ः (पहिला अभंग) सोहम गावस (दाडेश्वर कला केंद्र) यांना देण्यात आले, तर (दुसरा अभंग) लाभेश शैलेश कामत ( स्वर गंधार कला केंद्र, नानोडा ) यांना देण्यात आले. सुमित मंगेश संघ, चोडण यांना उत्कृष्ट गवळण /भारुड गायनाचे पारितोषिक देण्यात आले. लक्षदीप गावस (श्री रवळनाथ बाल भजनी मंडळ, मयडे) याना संवादिनीसाठीचे पारितोषिक देण्यात आले. शंकर सावंत, इंद्रकांत कुडणेकर व ज्ञानेश्वर पालयेकर यांनी परीक्षण केले.

केंद्र. क्र. ३

श्री सातेरी देवस्थान सभागृह, आमराल बांध, ताळगाव येथे २० जुलै रोजी घेतलेल्या तिसऱ्या केंद्रावर अनुक्रमे ः सरकारी माध्यमिक विद्यालय, आमोणा-डिचोली, स्वर साधना सांस्कृतिक कला संस्था, माडेल, चोडण व श्री कृष्ण नागझरकर बाल भजनी मंडळ, भोमा यांना प्राप्त झाले. उत्तेजनार्थ ः श्री जगदंबा षष्टी शांतादुर्गा बाल भजनी मंडळ, धाकटे भाट, डोंगरी, श्री शांतादुर्गा लक्ष्मी नरसिंह साखळ्यो संस्थान, सांखवाळ व स्वर गंधा बाल भजनी मंडळ, चिंबल.

वैयक्तिक उत्कृष्ट गायन ः (पहिला अभंग) कश्वी गावस (स.मा. विद्यालय, आमोणा) तर (दुसरा अभंग) भक्ती खांडेपारकर (स्वरदीप कल्चरल असो., आमोणा) यांना देण्यात आले. संज्ञा च्यारी यांना उत्कृष्ट गवळण /भारुड गायनाचे पारितोषिक देण्यात आले आहे. दिलीप रेडकर, अजित नाईक गावणेकर व विनोद तोरस्कर यांनी परीक्षण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर 3 फूट पाणी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचा खोळंबा

History: अकबराचा धर्म 'दीन ए इलाही'

Goa Congress: ...तर गिरीश चोडणकर यांनाच हटवा! काँग्रेसला खंबीर नेतृत्वाची गरज- राधाराव ग्रासियस

Goa politics: आता शेतजमिनीही खाणार का?विजय सरदेसाई यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

VIDEO: 'लग्नापूर्वी मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये, मी बायसेक्शुअल आहे", 'लॉक अप 2'मध्ये आकांक्षा चमोलाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT