Goa: राज्यात ऑनलाईन फ्रॉड होण्याचे प्रकार वाढले असून 12 जणांना साडेसात लाख रुपयांचा फटका बसला आहे. आमची लिंक उघडा, तुम्हाला विमान कंपनीत नोकरी मिळू शकते,’ असे मेसेज पाठवून लोकांना लुटणारी टोळी सक्रीय झाली आहे. सध्या अशा फसवणुकीच्या प्रत्येकी दोन तक्रारी मायणा कुडतरी व कोलवा पोलिस स्थानकात नोंद झाल्यात. तर अन्य तक्रारी वास्को पोलिस स्थानकावर नोंद झाल्या आहेत.
कोलवा पोलिसांनी सांगितले, एका महिलेला तुमचे विजेचे बिल भरायचे बाकी आहे. बिल न भरल्यास आज रात्री तुमचे विजेचे कनेक्शन तोडण्यात येईल असा संदेश ई-मेल वर आला. बिल भरण्यासाठी ती लिंक उघडली असता त्यांच्या खात्यातून 75 हजार काढले गेले.
अन्य एका व्यक्तीला इन्स्टाग्राम (Instagram) वरून संपर्क करून 40 हजारांचा गंडा घातला. तर एकाला एचडीएफसी बँकेत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 58 हजारांचा गंडा पडला आहे. तर तुम्हाला इंडिगो विमान कंपनीत नोकरी मिळाली, असे सांगून त्यासाठी पैसे भरा असे म्हणत एकाला लुबाडण्यात आले.
सुभाष चंद्राला अटक-
विविध योजनेमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून गोव्यातील अनेकांना गंडा घातलेल्या दिल्लीतील युडिओ प्रा. लि. कंपनीचा प्रोमोटर्स सुभाष राजेशकुमार चंद्रा (42) याला आर्थिक गुन्हे कक्षाच्या पथकाने दिल्ली येथे अटक केली. या कंपनीने फातोर्डा - मडगाव येथे युडिओ प्रा. लि. कंपनी सुरू केली होती. विविध योजनांकडे आकर्षित होऊन दक्षिण गोव्यातील काहींनी झटपट भरमसाट पैसे दुप्पट होण्याच्या आशेने त्यामध्ये गुंतवले होते.
ही प्रत्यक्ष स्वरूपात केलेली गुन्हेगारी नसून कदाचित इंग्लंड आणि अमेरिकेत बसून अशी कृत्ये केली जाऊ शकतात. आम्ही या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, नागरिकांनी सतर्कता बाळगूनचे व्यवहार करावे, असे आवाहन आहे. - जसपाल सिंग, पोलिस महासंचालक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.