CM pramod sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: भेदभाव निर्माण करणाऱ्यांपासून सावधान; मुख्यमंत्री सावंत

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: देशात जात-धर्म भेद निर्माण करणाऱ्या शक्ती आजही कार्यरत आहेत. त्यांना कुणीही बळी पडता कामा नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. देशाच्या फाळणीच्या वेदना दृश्य प्रदर्शन सरकारकडून सोमवारी, 14 ऑगस्ट रोजी म्हापसा येथील कदंबा बसस्थानकावर भरविण्यात आले.

या कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री सावंत हे बोलत होते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री नीळकंठ हळर्णकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, खासदार सदानंद तानावडे, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी हा दिवस प्रत्येकाच्या स्मरणात राहणे गरजेचे असल्याचे म्हटले. अखंड भारताची तीन देशात फाळणी झाली. ब्रिटीशांनी भारतातून जातेवेळी देशाचे दोन तुकडे केले. त्यामुळे 14 ऑगस्ट 1947 हा दिवस कधीच विसरता येणार नाही.

हिंदू आणि मुसलमान यांच्यात विभागणी करण्यात आली. मुसलमानासाठी पाकिस्तान हा नवीन देश बनवला. हे करतेवेळी पाकिस्तानात राहणाऱ्या असंख्य हिंदूची हत्या केली.

त्यांचे मृतदेह नंतर रेल्वेतून भारतात पाठवण्यात आले. त्या दिवसाची भारतीयांना आठवण व्हावी, यासाठी हे प्रदर्शन मांडण्यात आले.

प्रदर्शनातील प्रत्येक पोस्टरमधून फाळणीची माहिती पुरवण्यात आली आहे. लोकांनी ती समजून घ्यावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वजण एकसंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण एकसंघ आहोत. आझादीच्या अमृत महोत्सवअंतर्गत ‘विकसित भारत २०४७’ याचा विचार सुरू आहे.

याचा विचार करताना सर्वांचा सर्वांगीण विकास करीत कुठल्याच जाती धर्मात विभागणी केली नाही, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले. सुमारे ५०हून अधिक माहितीपूर्ण चित्रफलकांच्या माध्यमातून फाळणीबद्दल प्रदर्शन भरविले गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT