WhatsApp Update Dainik Gomantak
गोवा

बनावट व्हॉट्‌सअप खात्यापासून सावध राहा!

सायबर गुन्हे विभागातर्फे आवाहन, पैशासाठी काहींचा उपद्‍व्याप

दैनिक गोमन्तक

पणजी : काही राजकारणी तसेच महनीय व्यक्तींच्या छायाचित्रांचा वापर करून बनावट व्हॉट्‌सअप खाते उघडण्याचे प्रकार देशभरात सुरू असून त्याच्या तक्रारी नोंद होत आहे. या बनावट खात्यावर काही अधिकाऱ्यांचीही छायाचित्रे पोस्ट केली जात आहेत. त्यामुळे लोकानी अशा व्हॉट्‌सअपखात्यापासून सावध राहण्याचे आवाहन सायबर गुन्हे विभागाचे अधीक्षक सुनील वाल्सन यांनी केले आहे.

काही व्यक्ती बनावट व्हॉट्‌सअपखाते उघडून पैशांची मागणी करत आहेत. तसेच त्यासाठी ते विविध कारणे त्यावर पोस्ट करत आहेत. या खात्यावरून लोकांना मदत करण्याचे आवाहन केले जात आहे. ही मदत गिफ्ट कार्डस् या स्वरुपात ट्रान्सफर करण्याची विनंती करत आहे. कोणतीही शहानिशा केल्याशिवाय किंवा त्याची माहिती असल्याशिवाय अशा प्रकारांना बळी न पडण्याचे पोलिसांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

हल्लीच एका मंत्र्यांच्या नावाने व्हॉट्‌सअप खाते उघडून त्यावरून विविध क्षेत्रातील घटकांना व व्यक्तींना संदेश पाठवण्यात आले होते. या प्रकरणाचा छडा पोलिसांना लावण्यात यश आले आहे.

एखाद्या अनोळखी व्हॉटस्अप खात्यावरून कोणी पैसे किंवा गिफ्ट कार्डस् यासंदर्भात माहिती मागितल्यास त्याची शहानिशा केल्याशिवाय त्याला उत्तर देऊ नये. या खात्यावर मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांचे तसेच महनीय व्यक्तींची छायाचित्रे लावून लोकांना भुरळ पाडत आहेत. अशा वेळी कोणताच व्यवहार करू नये. संशयास्पद मेसेज व्हॉटस्अप आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT