High Court of Bombay at Goa Dainik Gomantak
गोवा

Goa High Court: सावधान! उघड्यावर कचरा टाकताय? हायकोर्टाने हरमल पंचायतीला ठोठावला 50 हजाराचा दंड

इतर पंचायतींनाही घेतले फैलावर

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa High Court: गोव्यात कुठेही, कसाही, इतस्ततः कचरा टाकण्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्यातील अनेक पंचायतींना फटकारले आहे. तर हरमल (आरंबोळ) पंचायतीला न्यायालयाने 50 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

दरम्यान, एमआरएफ सुविधा नसल्याने हळदोणा पंचायतीच्या सरपंच आणि सचिवाला न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, कचरा प्रकरणावरून भाटी पंचायतीने 3 लाख रूपये न्यायालयात जमा केले आहेत.

कचरा डंप कुठे करायचा याबाबत अनेक पंचायतींना अडचण आहे. काही पंचायतींनी शेड उभा केली होती, मात्र तिथे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची काहीही सुविधा नाही, त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, हा अनेक पंचायतींसमोरचा यक्ष प्रश्न बनला आहे.

दरम्यान, आता हायकोर्टाने केलेल्या कारवाईनंतर अनेक पंचायतींचे धाबे दणाणले आहेत. कचऱ्याचा प्रश्न मार्गी न लावणाऱ्या किंवा कचरा कुठेही टाकणाऱ्या सर्वच पंचायतींवर अशा पद्धतीच्या कारवाईची टांगती तलवार आगामी काळात राहू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

Illegal Construction: बेकायदा बांधकामप्रकरणी म्हापसा पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना अवमान नोटीस; 15 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT