Betting in Goa Dainik Gomantak
गोवा

Betting in Goa: पाकिस्तानमधील मॅचवर गोव्यात बेटिंग; दिल्लीच्या चौघांना अटक

गोवा पोलिसांचा छापा, तीन लाख रूपयांसह 5 मोबाईल फोन जप्त

Akshay Nirmale

Betting in Goa: पाकिस्तान सुपर लीगमधील सामन्याच्या निकालावर सट्टा लावल्याबद्दल गोवा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे, ते सर्व मूळचे दिल्लीचे आहेत आणि त्यांच्याकडून ₹ 3 लाख रूपये जप्त केले आहेत, तसेच दोन लाखांचे 5 मोबाईल फोनही जप्त केले आहेत. अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

क्रिकेट सट्टेबाजप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे सुरिंदर कार्ला, रजत कार्ला, कशिश कार्ला व हितेश कार्ला अशी आहेत. ते मूळचे दिल्लीतील असून गोव्यात सट्टेबाजी करण्यासाठी गोव्यात आले होते. त्यासाठी त्यांनी बादे - हणजूण येथे ला पासादो व्हिला भाडेपट्टीवर घेतला.

सट्टेबाजीवेळी दिल्लीत अटक होऊ नये म्हणून त्या चौघांनी सुरक्षित जागा म्हणून गोव्यात आले होते. पोलिसांना या सट्टेबाजीसंदर्भात पोलिस खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. 26 फेब्रुवारीला पाकिस्तान सुपर लिग क्रिकेटचा सामना लाहोर क्यूलँडर्स विरुद्ध पेशावर झल्मी यांच्यात सुरू होता.

त्यावेळी संशयित मोबाईलवरून ऑनलाईन सट्टेबाजी स्वीकारत होते. या सामन्यासाठी ग्राहकांकडून त्यांनी ऑनलाईन 3 लाखांची रक्कम सट्टेबाजीसाठी स्वीकारली होती. गोवा जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3 व 4 तसेच भादंसंच्या कलम 120 ब खाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधन वाल्सन म्हणाले की, या सामन्यासाठी ग्राहकांकडून स्वीकारण्यात आलेली ₹ 3 लाख रूपयांचे बेटिंग घेतले होते. ते मोबाईल फोनचा वापर करून जुगार खेळत होते. दोन लाख रूपयांचे पाचही मोबाईल जप्त केले आहेत.

पुढील महिन्यातील मार्चच्या अखेरीपासून देशात आयपीएल लिग क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेच्यावेळी मोठ्या प्रमाणात सट्टेबाज गोव्यात भाडेपट्टीवर बंगले किंवा फ्लॅट घेऊन व्यवहार करत असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

पोलिसांनी छापे टाकून त्यांच्यावर कारवाई केली आहे. या स्पर्धेवेळी गोव्यात वास्तव्य करणाऱ्या सट्टेबाजांची माहिती मिळवण्यासाठी पोलिस गुप्तचर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे व त्यासाठी पोलिस पथकेही नेमण्यात आली आहेत.

भाडेपट्टीवर बंगले तसेच फ्लॅट देणाऱ्या मालकांनाही यासंदर्भात माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

बेकायदेशीर जुगार आणि बेकायदेशीर गेमिंग हाऊसेस यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. हा छापा देखील या कारवाईचाच एक भाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT