Raechelle Banno At IFFI 2024
पणजी: नेहमी काहीतरी नवीन आणि आव्हानात्मक करण्याचा अभिनेत्यांवर प्रचंड दबाव असतो. चित्रपटासाठी मी साकारलेल्या भूमिकेची प्रतिमा चांगली आणि परिपूर्ण असली पाहिजे आणि बदल आवश्यक आहे, असे मला नेहमीच वाटत होते. कुठलीही भूमिका साकारताना कलाकारांचा हेतू सर्वकाही असतो.
प्रेक्षक आपल्या भूमिकेशी जोडली जातील अशी भूमिका साकारली पाहिजे. माझ्यावर आजही नवीन आणि आव्हानात्मक काहीतरी करण्याचा दबाव असतो, असे ''बेटर मॅन'' या ऑस्ट्रेलियन चित्रपटाच्या अभिनेत्री रीएचेल बान्नो यांनी सांगितले.
एका खास मुलाखतीत त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल आणि चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना आलेल्या आव्हानांबद्दल सांगितले. ''बेटर मॅन'' चित्रपटात मी साकारलेली भूमिका हाताळणे आव्हानात्मक होती. तसेच ''बेटर मॅन'' चित्रपटातील कार्य पूर्ण करण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्याही आव्हानात्मक होते. इफ्फीला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद तर झालाच परंतु जो प्रतिसादाला लाभला तो अनुभवणे अजून चांगले होते, असे त्या म्हणाल्या.
''बेटर मॅन''मधील भूमिका मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या विशेषतः कठीण होती. शूटिंग दरम्यान आलेली आव्हाने देखील महत्त्वाची होती, परंतु चित्रपटाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहिल्यावर अत्यंत आनंद मिळाला. प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहून आणि माझे काम त्यांना आवडल्याचे जाणून खूप आनंद होतो. माझ्यासाठी हा खरोखरच आनंददायी अनुभव असल्याचे रीएचेल बान्नो म्हणाल्या.
बेटर मॅन (२०२४)
रुबी (२०२१)
पर्ल इन द मिस्ट (२०२१)
ऑल दॅट ग्लिटर्स (२०२१)
हिडन ज्वेल (२०२१)
सेकंड बेस्ट (२०१७)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.