Betoda Waste Management Project Dainik Gomantak
गोवा

Ponda: बेतोडा पंचायतीच्या वैद्यनगरातील कचरा प्रकल्पाचे काम पूर्ण, पण स्थानिकांचा अचानक विरोध; लोकार्पणावर टांगती तलवार

Betoda Waste Management Project: बेतोडा ग्रामपंचायतीने वैद्यनगर येथे आत्मनिर्भर भारत अंतर्गत मिळालेल्या ५० लाख रुपये खर्च करून उभारलेल्या कचरा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: बेतोडा ग्रामपंचायतीने वैद्यनगर येथे आत्मनिर्भर भारत अंतर्गत मिळालेल्या ५० लाख रुपये खर्च करून उभारलेल्या कचरा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र हा प्रकल्प लोकवस्तीजवळ असल्याने स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे लोकार्पण होणार की नाही याबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार ९० टक्के काम पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे उर्वरित १० टक्के काम पूर्ण करण्यात पंचायतीला दोन वर्षे लागली. सुरवातीला या प्रकल्पाला कोणीही विरोध केला नव्हता, मात्र ९० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिकांनी या विरोधात अचानक आवाज उठवला. दुसऱ्या बाजूने पंचायतने या प्रकल्पाचे काम पूर्ण करून घेतले.

प्रकल्प सुरू करून पंचायत क्षेत्रातील कचऱ्याची विल्हेवाट या प्रकल्पातून लावण्याचा प्रयत्न पंचायत करीत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे लवकर लोकार्पण करण्यासाठी सरपंच मधू खांडेपारकर हे प्रयत्नात आहेत.

लवकरच लोकार्पण : सरपंच

सरपंच मधू खांडेपारकर यांनी सांगितले की, जमीन संपादन करून ९० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर काही स्थानिक लोकांनी प्रकल्पाला विरोध चालू केला. त्यामुळे प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात अडथळा निर्माण झाला होता. परंतु आता उर्वरित राहिलेले १० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे लवकरच लोकार्पण करण्यात येईल.

अरुंद रस्ता

कचरा प्रकल्प पूर्ण झाला असला तरी या प्रकल्पाला जोडणारा रस्ता लोकवस्तीतून जातो, हा रस्ता अरुंद असल्याने कचरा वाहतुकीत समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या रस्त्याकडे पंचायतीला लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच संबंधित खात्याचे मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांनी स्थानिकांशी चर्चा करून तोडगा काढणे आवश्‍यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT