Bethora Theft Dainik Gomantak
गोवा

Bethora Theft: बेतोडा येथे घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास! फॉरेन्सिक पथकाला पाचारण

Goa Crime: चोरट्यांनी पहिल्या मजल्यावर येऊन बाजूला लावलेल्या चाव्या काढून खोल्या उघडल्या

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: बोणबाग, बेतोडा येथील रुबिना मंझिल या इमारतीत गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरी करून रोख रकमेसह सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.

बोणबाग येथील रुबिना मंझिल या दोन मजली इमारतीत ही धाडसी चोरी करण्यात आली आहे. या इमारतीतील कुटुंबीय तळमजल्यावर काल रात्री झोपले होते.

या इमारतीवर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी पहिल्या मजल्यावर येऊन बाजूला लावलेल्या चाव्या काढून खोल्या उघडल्या आणि आतील कपाटातील रोख रुपये २० हजार तसेच सोन्याच्या साखळ्या व इतर सोन्याचे दागिने मिळून सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये या इमारतीच्या मागच्या बाजूला एक चोरटा हातात लोखंडी सळी घेऊन वावरत असल्याचे दिसले आहे. चोरी एकट्याने केली की आणखी कुणी होते, याबाबत काहीच समजू शकले नाही.

चोरीची तक्रार दिल्यानंतर फोंडा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. यावेळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले.

सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली, मात्र चोरटे अजून सापडलेले नाहीत. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

दोन महिन्यांत पाच चोऱ्या!

दरम्यान, फोंड्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून मागच्या दोन महिन्यांत चार घरफोड्या झाल्या आहेत. आता ही पाचवी चोरी असून फोंडा पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी फोंडावासीयांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT