Mormugao Press Conference  Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port: मुरगाव बंदर खासगीकरण करण्याचा घाट; पत्रकार परिषदेतून विरोध

Mormugao Port Authority: धक्का क्र. १० व ११ चे खासगीकरण केल्यापासून सर्वसामान्य व्यावसायिकांचे हाल होत असल्याचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

मुरगाव पत्तन प्राधिकरणाने जेव्हापासून धक्का क्र: १० व ११ चे खासगीकरण केले, तेव्हापासून सर्वसामान्य व्यावसायिकांचे हाल होत आहेत. ‘एमपीए’ने आता संपूर्ण बंदराचे खासगीकरण करण्याचा घाट घातला असून आमचा त्याला विरोध असल्याचे ‘एमपीए’मधील स्टीव्हडोअर संघटना, हाताळणी एजंट, कामगार कंत्राटदार संघटना, टिप्पर ट्रकमालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून केला.

पत्रकार परिषदेत भवानी शिपिंगचे एस.पी. त्रिपाठी म्हणाले की, बंदराचे खासगीकरण पूर्णत: बेकायदेशीर आहे. खासगीकरण करायचे होते तर धक्का क्र: ९ चे करायला हवे होते. धक्का क्र: १० व ११ खासगी कंपनीला देऊन एकप्रकारे एमपीएने आमच्या विरोधात षडयंत्र रचले आहे.

आम्हाला सहकार्य करण्यासाठी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर पुढाकार घेत असताना त्यांच्या बदनामीचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला.वसीम शेख म्हणाले की, आम्ही अनेक वर्षांपासून बंदरातील माल हाताळत आलो आहे.

ट्रक व्यावसायिकांचेही हाल

संबंधित कंपनीने धक्का क्र: १० व ११ वर दहाचाकी ट्रक माल हाताळणीसाठी आणल्यास याचा आमच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होणार असल्याची माहिती टिप्पर ट्रकमालक संघटनेचे हेमंत शेटगावकर यांनी दिली. नितीन पालकर यांनी सांगितले की, धक्का क्र: १० व ११ चे खासगीकरण केल्यामुळे आम्हाला व्यवसाय मिळणे कठीण झाले आहे.

बदनामीचे कट-कारस्थान

आमचा ‘एमपीए’च्या खासगीकरणाला तीव्र विरोध असून, याविषयी आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. आम्ही बंदरातील कोणत्याही मालाची हाताळणी रोखलेली नाही. फक्त आमची पूर्वीची बिले न दिल्याने हे पाऊल उचलावे लागले. यात आमची बदनामी करण्याचे षडयंत्र एक कंपनी करत असल्याचा दावा वासीम शेख यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT