Betalbatim Beach Dainik Gomantak
गोवा

Betalbatim Beach: दुर्दैवी घटना! बेताळभाटी समुद्रात बंगळुरूच्या पर्यटकाचा बुडून मृत्यू

Crime News: कर्नाटक येथील पर्यटकाचा बेताळभाटी समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे.

Sameer Amunekar

मडगाव: दक्षिण गोव्यातील बेताळभाटी किनाऱ्यावर एका दुर्दैवी दुर्घटनेत भरथ एस. के. (वय- ३७ वर्ष) बंगळुरू येथील पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (३ मार्च) घडली असून, स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केलीय.

संबंधित पर्यटक गोव्यात फिरायला आला होता. सोमवारी दुपारी बेताळभाटी बीचवर पोहण्यासाठी उतरला असता बुडून त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासानंतर याला अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

गोवा हे भारतातील एक प्रसिद्ध समुद्रकिनारी असणारं पर्यटन स्थळ आहे, जेथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र, समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षितता हा मोठा मुद्दा आहे.

गोवा पोलीस आणि पर्यटन विभाग वारंवार सूचना देत असले तरी अनेक पर्यटक त्या पाळत नाहीत, ज्यामुळे अशा दुर्घटना घडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT