honey bee 
गोवा

मधमाशी पालन फळांच्या परागीभवनासाठी लाभदायी

पद्माकर केळकर

वाळपई: केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता शेती, बागायती करीत असताना शेतीपुरक व्यवसायाची कास धरली, तर किफातशीर शेती होऊ शकते. सत्तरी तालुका शेती, बागायतींचे अधिस्तान बनलेले आहे. केळी, नारळ, सुपारी, मिरी, जायफळ, काजू, फणस, आंबा, भात, ऊस अशा विविध पिकांनी सत्तरी तालुका नेहमीच बहरलेला असतो, पण आता या मुख्य पिकांबरोबरच येथील लोक जोड व्यवसायाशी बांधले जात आहेत. असाच एक प्रयोग म्हणून शेती, बागायतीला बळकटी व चालना देण्यासाठी मधमाशी पालन काही शेतकरीवर्ग करीत आहेत. गोवा सरकारच्या शेतकी विभागाच्या आत्मा प्रकल्पाअंतर्गत जवळपास दहा शेतकरी बांधवांना या मधपेट्या वितरीत केल्या आहेत. त्यापैकी काही ठिकाणी मधाचे पोळे तयार होऊन मध काढलेले आहे. त्यामुळे सत्तरीत मधमाशी पालनाला चालना मिळत आहे.

केवळ मध उत्पादन असे न पहाता त्यातून परागी भवनाला होणारा फायदा लाख मोलाचा ठरणारा आहे. मधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे. शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करू शकतात. मधमाशा फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रुपांतर करतात आणि त्यांना पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. जंगलांमधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याने मधमाशी पालनाचा उद्योग एक टिकाऊ उद्योग म्हणून सत्तरीत उदयास येत आहे.

मध आणि मेण ही मधमाशी पालनातून मिळणारी आर्थिकदृष्ट्या महत्वाची दोन उत्पादने आहेत. शेतकी खात्याने आत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू केलेला उपक्रम अतिशय सुरेखच म्हणावा लागेल. मधमाशी पालनासाठी वेळ, रुपये आणि पायाभूत गुंतवणुकीची आवश्यकता असते. मध आणि माशांनी तयार केलेले मेण शेतीच्या दृष्टीने फारसे मूल्यवान नसलेल्या जागेतून उत्पादित करता येते. मधमाशा स्रोतांसाठी कोणत्याही अन्य शेती उद्योगासोबत स्पर्धा करीत नाहीत. मधमाशी पालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होणारे आहेत. मधमाशा फुलोरा येणाऱ्या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात.

त्यामुळे सूर्यफूल, आंबा, काजू, सुपारी, नारळ, जांभूळ, पेरू अशा विविध फळे यांसारख्या ठराविक पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मध हे एक रुचकर आणि अत्यंत पोषक अन्न आहे. मध गोळा करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे मधमाशांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे मधमाशांचं पेट्यांमध्ये संगोपन करून आणि घरच्या घरीच मध उत्पादन घेऊन हे टाळता येते. वैयक्तिक पातळीवर सध्या सत्तरीत घरी मधमाशी पालन केले जात आहे. तसेच गटगटाने देखील मधमाशी पालन सुरू करता येते. मध आणि मेण यांच्यासाठी बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

कोणत्याही इतर जास्तीच्या खतांशिवाय, बियांशिवाय मधमाशी पालन हे शेताच्या बांधावर/शेतालगत केल्याने त्याचा फायदा शेतीला होतो. शेतीतील भाजी, फुलांच्या उत्पादनात सव्वा ते दिड पटींनी वाढ होते. कारण मधमाशा या परागीकरणाचे काम उत्तमरित्या करतात. मधाच्या सेवनाने मानवाचे आरोग्य उत्तम राहते. मधाचे सेवनाने अनेक रोग होत नाहीत. रक्तदाब, लठ्ठपणा आदी रोगांमध्ये फायदा होतो. मधमाशी पालनात फारच कमी खर्च लागतो व तुलनेने कमी वेळपण लागतो. त्यास जागाही फारच कमी लागते. कमी प्रतवारी असणाऱ्या जमिनीच्या शेतात मधमाशी पालनाचे फायदे आहेत. बाजारात मधाच्या मागणीस वाढता प्रतिसाद बघता मधमाशी पालन हा एक फायदेशीर व आर्थिक प्राप्ती देणारा उद्योग आहे. त्यापासून निघणारे नैसर्गिक मेणही आर्थिक लाभ देते.

कोट: आपल्याकडे सात मधाच्या पेट्या आहेत. त्यापैकी पाच पेट्या आत्मा अंतर्गत मिळालेल्या आहेत. मधमाशी पालन केवळ आर्थिक बाजू न बघता आम्ही बागायतीत फळ झाडांना परागीभवनासाठी उपयोग होण्यासाठी मधमाशी पालन केले आहे. सध्या पेटीत मधाचे पोळे तयार होऊन मध काढलेले आहे. त्यासाठी आपण प्रशिक्षण घेतलेले होते. त्याची माहिती आपण चिरंजीव श्री. प्रद्युम्न गाडगीळ याला दिली व तो आता पोळ्यातून मध काढीत आहे. - सौ. प्राजक्ता कृष्णप्रसाद गाडगीळ (खोडये - सत्तरी)

आपणाला शेतकी खात्याच्या आत्माच्या माध्यमातून तीन मधाच्या पेट्या मिळाल्या आहेत. एका पेटीची साडेचार हजार रुपये किंमत आहे. या मधमाशा परिसरातील सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर जाऊन विविध फळ झाडे, फुल झाडे यांच्या फुलांवर बसून मध गोळा करीत आहे. त्यामुळे येत्या काळात घरगुती मध मिळणार आहे. मधमाशी पालन हा शेती, बागायतीमधील अत्यंत महत्वाचा दुवा आहे.

- श्याम गावकर (साट्रे - सत्तरी)

सत्तरी तालुक्यात सौ. प्राजक्ता गाडगीळ, मिलिंद गाडगीळ, उदय सावंत, सोमनाथ गावस, राजेंद्र गावस, श्याम गावकर, धनंजय मराठे, नवनाथ पिसुर्लेकर, रणजीत म्हापसेकर, विनोद बर्वे यांना या मधाच्या पेट्या वितरीत करून वरील शेतकरी मधमाशी पालन करीत आहे. सत्तरी तालुक्यात या व्यवसायाला वाव असून शेतकी खाते नेहमीच त्यासाठी कार्यवाही हाती घेऊन शेती, बागायतीच्या प्रोत्साहनासाठी काम करणार आहे.

- प्रकाश राऊत (कृषी अधिकारी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kurdi: 1882 साली सोमेश्वराची घटना पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे! साळावली धरणाच्या जलाशयाखाली बुडालेले 'कुर्डी' गाव

Bengaluru Airport Bomb Threat: "माझ्याकडे दोन बॉम्ब आहेत", बंगळुरु विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा; इंडिगो प्रवाशाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Chimbel Protest: चिंबलवासीयांचे महाआंदोलन! शेकडो ग्रामस्थ पोचले जुने गोवेत; अधिसूचना येईपर्यंत उपोषणाचा इशारा Video

Air Force Base Attack: विमानतळावर गोळीबार अन् स्फोटांचा आवाज! एअर बेसला दहशतवाद्यांनी बनवलं निशाणा; 20 ठार, 11 जणांना बेड्या VIDEO

Social Media Ban Goa: सोशल मीडिया वापरावर सरसकट बंदी अयोग्य! तवडकरांचे प्रतिपादन; अभ्यासावर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त

SCROLL FOR NEXT