goa Dainik Gomantak
गोवा

Benaulim ZP By- Election : कमी मतदान; उत्कंठा वाढली, आज मडगावात होणार मतमोजणी

Benaulim ZP By- Election : या पोटनिवडणुकीसाठीच्या २०,१२९ मतदारांपैकी केवळ १०,४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

गोमन्तक डिजिटल टीम

Benaulim ZP By- Election :

सासष्टी, बाणावली जिल्हा पंचायत पोट निवडणुकीत केवळ ५२.१२ टक्के मतदान झाल्याने निकालाची उत्कंठा वाढली आहे.

या पोटनिवडणुकीसाठीच्या २०,१२९ मतदारांपैकी केवळ १०,४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ४५३१ पुरूष व ५९६१ महिला मतदारांचा समावेश आहे. ही निवडणूक बाणावलीचे आम आदमी पक्षाचे आमदार वेन्झी व्हिएगससाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

दरम्यान, उद्या सोमवार, २४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून माथानी साल्ढाणा जिल्हा प्रशासन इमारतीच्या तळमजल्यावर मतमोजणी सुरू होईल. या वेळी ‘ईव्हीएम’ नव्हे तर मतपत्रिकांद्वारे मतदान झाल्याने निकाल साडे अकरा ते १२ वाजेपर्यंत लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या निवडणुकीत ‘इंडिया’तर्फे ‘आप’च्या जोसेफ पिमेंतो, ग्रेयफन्स फर्नांडिस, श्रीमती रॉयला फर्नांडिस व फ्रॅंक फर्नांडिस हे अपक्ष उमेदवार आहेत. मात्र, आजच्या मतदानावरून खरी लढत जोसेफ पिमेंता, श्रीमती रॉयला फर्नांडिस व ग्रेयफन्स फर्नांडिस यांच्यात असल्याचे स्पष्ट झाले.

या तिन्ही उमेदवारांनी व त्यांच्या पाठिराख्य़ांनी आपलाच उमेदवार जिंकेल, असा विश्र्वास व्यक्त केला आहे.

बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत २०,१२९ मतदारांची यादी निश्र्चित करण्यात आली. ही निवडणुकीसाठी २७ मतदान केंद्रे स्थापण्यात आली व १३५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. शिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर चांगला पोलिस बंदोबस्त होता.

बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी सांगितले की, लोकांना बाणावलीत शांतता व ऐक्य पाहिजे. त्यानुसारच लोकांनी आज मतदान केले आहे. इंडिया आघाडी हेच देशाचे व गोव्याचे भवितव्य असल्याची लोकांना खात्री पटली आहे. ज्या प्रमाणे बाणावलीच्या पाच गावांनी आपल्याला निवडून दिले, त्या प्रमाणे यावेळीही ते आपल्यावर विश्र्वास दाखवून ‘आप’च्या जोसेफ पिमेंता याला विजयी करतील.

कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी स्विकारलेल्या रॉयला फर्नांडिसने सांगितले की २०२७ची विधानसभा डोळ्यांसमोर ठेवुन आमदार वेन्झी व्हिएगस आपले घोडे पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्याने सर्वप्रथम कॉंग्रेस पक्षात दुफळी माजवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र बाणावलीचे लोक त्यास बळी पडणार नाहीत.

बाणावलीचे सरपंच शावियेर फर्नांडिस यांनी अपक्ष उमेदवार ग्रेयफन्स फर्नांडिसच निवडून येतील, असे ठामपणे सांगितले. ग्रेयफन्सवर काही जणांनी भलतेच आरोप केले मात्र ते किती खोटे होते हे उद्या निकालावरुन स्पष्ट होईलच असे सरपंच म्हणाले.

वॉरन आलेमाव यांनी रॉयला फर्नांडिसची बाजू मजबूत झाल्याचे स्पष्ट केले. रॉयलामुळेच बाणावलीकरांवर झालेला अन्याय दूर झाला. कॅप्टन विरियातो व विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांचाही रॉयलाला पाठिंबा होता. मात्र, तिच्याविरोधात प्रचार करण्यास त्यांच्यावर दबाव आला. उद्या रॉयला विजयी झाल्यावर परत कॉंग्रेस पक्षात दाखल होईल तेव्हा खरे काय ते स्पष्ट होईलच, असेही वॉरन आलेमाव यांनी सांगितले.

‘इंडिया’तील दुफळी उघड

बाणावली बाणावलीत आज झालेल्या केवळ जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीचे मतदान होते. मात्र, या निवडणुकीला लोकसभा वा विधानसभा निवडणुकीसारखे महत्व मिळाले. गेले १५ दिवस आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडल्या. ‘इंडिया’तील दुफळी स्पष्ट झाली. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी भरली. या सर्व पार्श्र्वभूमीवर आजचे मतदान शांततापूर्ण व अनुचित प्रकार न घडता पार पडले.

बाणावलीच्या लोकांनी सुद्धा या निवडणुकीला जास्त महत्व दिलेले दिसत नाही. या निवडणुकीसाठी एका उमेदवाराला जास्तीत जास्त पाच लाखांच्या खर्चाची मर्यादा होती. पण ‘आप’ उमेदवाराने प्रचाराची जी उंची गाठली ती पाहता त्याचा खर्च तरी या मर्यादेत बसला असेल का?.

-रॉयला फर्नांडिस,अपक्ष उमेदवार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT