Benaulim water stream revival Dainik Gomantak
गोवा

Benaulim: ..आणि 50 वर्षांपूर्वींचा झरा पुन्हा वाहू लागला, बाणावलीतील अद्भुत घटना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर फुलले हसू

Benaulim Water Stream : बाणावली हा सासष्टीतील समुद्रकिनाऱ्यालगतचा एक प्रमुख गाव आहे. हा गाव नैसर्गिकरीत्या परिपूर्ण असून या गावात अनेक झरे वाहताना दिसत आहेत.

Sameer Panditrao

Benaulim Village Water Stream

सासष्टी: बाणावली हा सासष्टीतील समुद्रकिनाऱ्यालगतचा एक प्रमुख गाव आहे. हा गाव नैसर्गिकरीत्या परिपूर्ण असून या गावात अनेक झरे वाहताना दिसत आहेत. काही झरे बांधकामांमुळे बुजलेले आहेत तर काही विकासकामाच्या नावांखाली नष्ट केलेले आहेत. असाच एक बुजलेल्या अवस्थेत असलेला झरा पुनर्जीवित करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांना आनंद झाला आहे.

हा झरा पुनर्जीवित करण्यासाठी समाजकार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी बरेच कष्ट घेतलेले आहेत. आपण स्वखर्चाने हा झरा सुरू केला आहे, त्यासाठी आपल्याला एक लाख रुपये तरी खर्च येणार आहे. जर जलस्रोत खात्यातर्फे हे काम केले असते तर त्यांनी ५ लाख रुपये खर्च दाखविला असता, असेही वॉरन आलेमाव यांनी सांगितले.

रॉक फर्नांडिस म्हणाले की, आपण पंचायतीला झऱ्याचा पुनर्विकास करण्यासाठी अनेक पत्रे दिली होती; पण पंचायतीने ते गांभीर्याने घेतले नाही. आपण सामाजिक कार्यकर्ते वॉरेन आलेमाव यांना पुढाकार घेऊन खोदकाम सुरू करण्याची विनंती केली होती.

हा झरा ४० ते ५० वर्षांपूर्वी वाहत होता. नंतर तो बुझून गेला होता.दरम्यान, पंचसदस्य एझलिना फर्नांडिस यांनी सांगितले की, गावातील झरे पुनर्जीवित करण्यासाठी पंचायतीने ठराव घेतलेला आहे. हा झराही योग्य पद्धतीने बांधून काढला जाईल.

अनेकजण झऱ्याचे साक्षीदार!

गेरोन फर्नांडिस या शेतकऱ्याने सांगितले की, येथील सर्वात जुन्या झऱ्यांपैकी हा एक झरा आहे. त्यांच्या बालपणी ते या झऱ्याचे पाणी पीत आणि शेतीच्या कामांसाठीही वापरत असत; परंतु कालांतराने तो झरा कचराकुंडीत नष्ट झाला. जे शेतकरी या झऱ्याचे साक्षीदार आहेत त्यांना या झऱ्यात पाणी पाहून खूप आनंद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Population: लोकसंख्या का वाढवता?

Sanjivani Sugar Factory: संजीवनी साखर कारखान्याचे कर्मचारी वेतनाविना; वित्त खात्यात फाईल प्रलंबित, 2 महिन्यांचे वेतन अडल्याने कोंडी

Goa Traffic Diversion: मेरशी येथील अटल सेतूवर जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी 25 जूनपर्यंत बंद, पर्यायी मार्ग कोणता?

Lucky Zodiac Sign: अब्जाधीश होण्याचा सुवर्णयोग! बँक बॅलन्स वाढणार अन् टेन्शन मिटणार; 20 जूनपासून 5 राशींचे नशीब पालटणार

कुडचडेतील ओहोळात अचानक माशांचा मृत्यू; कचरा प्रक्रिया प्रकल्पावर स्थानिकांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT