Churchill Alemao  Dainik Gomantak
गोवा

Churchill Alemao: 'तो' व्हिडिओ व्हायरल झाला अन् चर्चिल आलेमाव यांनी पोलिसांत धाव घेतली

कोलवा पोलिसांनी संबधित व्यक्तीला आक्षेपार्ह व्हिडिओ टाकल्याप्रकरणी अटक केली आहे.

Pramod Yadav

बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांच्या विरोधात एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात पुलाच्या कामात आलेमाव यांनी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडिओ फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर चर्चिल यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

कोलवा पोलिसांनी संबधित व्यक्तीला आक्षेपार्ह व्हिडिओ टाकल्याप्रकरणी अटक केली आहे.

आक्षेपार्ह व्हिडिओ टाकल्याप्रकरणी जेफ्री फर्नांडिस याला कोलवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी फौजदारी संहितेच्या कलम 151 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडिओ काय आहे?

जेफ्री फर्नांडिस याने फेसबुकवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. बाणावली येथील पुलाच्या कामाबाबत चर्चिल आलेमाव यांनी पैसे घेतले होते, आता या पुलाला भेगा पडल्या आहेत. असा आरोप संशयित फर्नांडिस याने व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.

व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर चर्चिल आलेमाव यांनी तात्काळ कोलवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी जेफ्री फर्नांडिस याला अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

SCROLL FOR NEXT