Anmod Ghat Dainik Gomantak
गोवा

Anmod Ghat: अनमोडमार्गे बेळगाव रस्ता वाहनांसाठी खुला

Anmod Ghat: अनमोड ते बेळगाव महामार्ग अवजड वाहनांसाठी आज सायंकाळी 7 वाजल्यापासून खुला करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

Anmod Ghat: अनमोड ते बेळगाव महामार्ग अवजड वाहनांसाठी आज सायंकाळी 7 वाजल्यापासून खुला करण्यात आला. त्यामुळे वाहनचालक तसेच प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा-बेळगाव महामार्गावरील तिनईघाट देवळी रेल्वे गेट येथे रस्ता दुरुस्त करण्यासाठी 5 ते 25 जानेवारीपर्यंत अवजड वाहनांना बंदी लागू केल्यामुळे खासगी तसेच अवजड वाहने अनमोड मार्गे बंद ठेवली होती. चारचाकी वाहनांना पर्यायी मार्ग दिला होता. आता रेल्वे विभागातर्फे हे काम पूर्ण झाले असल्याने 25 जानेवारीपासून मार्ग खुला केला आहे.

अनमोड घाट मार्ग दिनांक 5 ते 25 जानेवारीपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. रेल्वे विभागाच्या डबलिंग कामासाठी मार्ग बंद असेल असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता.

प्रवेश शुल्क:-

गोव्यातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहनांना अनमोड तपासणी नाक्यावर प्रवेश शुल्क भरावे लागत असून कर्नाटक वन खात्याने व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय वन्यजीव उद्यानातून जाणाऱ्या वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारणी सुरू केली आहे.

ट्राफिक जामची समस्या:-

अनमोड घाट हा बेळगांव आणि गोव्याला जोडणारा महत्वाचा घाटमार्ग असून दररोज हजारो वाहन या मार्गाने ये- जा करीत असतात. मागील आठवडाभरापूर्वी एका ट्रॉलीमुळे घाटात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.तसेच काही महिन्यांपूर्वी अनमोड ते रामनगरपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असल्यानेही वाहनचालकांना कसरत करावी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT