Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Beef In Goa: गोव्यात बीफ बंद होणार? पर्यटन मंत्री रोहन खंवटेंनी स्पष्टच सांगितलं

Goa Tourism: गोव्यासारख्या पर्यटन राज्यात येणाऱ्या पर्यटकांवर खाण्याचे कोणतेही बंधन नाही. ज्याना जे खायचंय ते खाऊ शकतात, असे रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले.

Pramod Yadav

पणजी: पर्यटनासाठी भारतातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध असणाऱ्या गोव्यात पर्यटनवाढीसाठी विविध प्रयोग केले जात असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले. राज्य स्पीरिच्युल हब म्हणून नावारुपास यावे आणि दक्षिण काशी अशी ओळख निर्माण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे खंवटे म्हणाले.

"गोव्यात विविध जाती – धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतायेत. सर्वच धर्मांचा येथे आदर केला जातो. दिवाळी असो किंवा चतुर्थी किंवा नाताळ सर्वच उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात आणि सर्वच एकमेकांच्या घरी भेट देतात. सर्वांना सर्वच प्रकारचे खाद्यान्न आवडते", असे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रोहन खंवटे म्हणाले. खंवटे यांनी राज्यात बीफ बंदी होणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले. 

गोव्यासारख्या पर्यटन राज्यात येणाऱ्या पर्यटकांवर खाण्याचे कोणतेही बंधन नाही. ज्याना जे खायचंय ते खाऊ शकतात, असे रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले. "अतिथी देवो भव:, आणि सेवा देवो भव: या तत्वावर विश्वास ठेवणारे आम्ही आहोत त्यामुळे पर्यटकांनी राज्यातून चांगल्या आठवणी घेऊन जावे हाच आमचा उद्देश आहे", असे खंवटे म्हणाले.

“अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि पर्यावरण या तीन स्तंभांवर रिजनरेटीव्ह पर्यटन उभं आहे. याद्वारे राज्यात अधिक पर्यटक यावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील संस्कृती, उत्सवांचा प्रसार, पर्यावरणाचे संरक्षण आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावणे यांचा यामध्ये विचार केला जात आहे. सी, सँड आणि बीच याच्यापलिकडे पर्यटकांना गोवा अनुभवावा”, असे खंवटे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT